घर खरेदी केल्यास मिळेल मोफत Tesla ची कार; ही आहे खास ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 13:24 IST2022-12-06T13:23:21+5:302022-12-06T13:24:03+5:30

या घराची किंमत किती आहे आणि या कारची खासियत काय आहे, याविषयी जाणून घ्या...

tesla model y free with this luxurious property in new zealand says report | घर खरेदी केल्यास मिळेल मोफत Tesla ची कार; ही आहे खास ऑफर!

घर खरेदी केल्यास मिळेल मोफत Tesla ची कार; ही आहे खास ऑफर!

घर खरेदी करा आणि फुकटात कार मिळवा, असे तुम्ही कधी ऐकले आहे का? पण आम्ही तुम्हाला सांगतो की, न्यूझीलंडमध्ये एक घर विकले जाणार आहे. या घरासोबत कार मोफत दिली जाणार आहे. दरम्यान, घराच्या मालकाने एक अप्रतिम डील आणली आहे, या डीलची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घराचा मालक घराच्या खरेदीवर Tesla Model Y कार मोफत देत आहे. या घराची किंमत किती आहे आणि या कारची खासियत काय आहे, याविषयी जाणून घ्या...

जर तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की, ही डील पूर्ण झाल्यानंतर घराचा मालक आपली जुनी कार ग्राहकाला देईल, पण तसे होणार नाही. मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, डील पूर्ण झाल्यानंतर घर मालक नवीन Tesla Model Y कार ऑर्डर करणार आहे. याचबरोबर, या घराचा मालक ग्राहकाला त्याच्या आवडीच्या रंगात ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा ऑप्शन देईल. पण, इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या कारचे कोणते व्हेरिएंट या घरासोबत दिले जाईल, याची माहिती दिलेली नाही. मात्र, या कारचे एंट्री-लेव्हल RWD व्हेरिएंट दिले जाऊ शकते, ज्याची किंमत न्यूझीलंडमध्ये 76,200 डॉलर (जवळपास 39 लाख 65 हजार 409 रुपये 90 पैसे) आहे, असे म्हटले जात आहे. 

Tesla Model Y ची खासियत
टेस्ला कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, Tesla Model Y मध्ये फूल चार्ज केल्यानंतर 531 किलोमीटरपर्यंत रेंज देण्याची क्षमता आहे. याशिवाय, 360 डिग्री रिअर, साइड आणि फॉरवर्ड फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. टेस्ला व्हिजन फीचर आजूबाजूला धावणाऱ्या गाड्यांना डिटेक्ट करते, ज्यामुळे अपघात टाळता येऊ शकतो. तसेच, हे फीचर पार्किंगवेळी ग्राहकांना मदत करते. या कारला 15 इंचाचा इंफोटेंमेंट सिस्टम देण्यात आला आहे.

घरासंबंधी डिटेल्स
घराचा मालक न्यूझीलंडमधील आपले घर 1.1 मिलियन डॉलर (जवळपास कोटी लाख हजार रुपये) मध्ये विकत आहे. या घरात सात बेडरूम, दोन किचन आणि पाच बाथरूम आहेत. याचबरोबर, घराच्या मागील बाजूस एक ग्राऊंड फ्लोअर, एक फर्स्ट फ्लोअर आणि एक गॅरेज आहे. रिअल इस्टेट एजंट Barfoot & Thompson ची लिस्टिंगनुसार, पाच गाड्यांसाठी ऑफ-स्ट्रीट पार्किंग स्पेस सुद्धा देण्यात आले आहे, ज्याला इलेक्ट्रिक गेटद्वारे अॅक्सेस देण्यात आला आहे.

Web Title: tesla model y free with this luxurious property in new zealand says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.