भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:03 IST2025-07-12T18:44:45+5:302025-07-12T19:03:21+5:30
भारतात लवकरच टेस्लाचे पहिले शोरूम सुरू होणार आहे. १५ जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे अधिकृतपणे उघडले जाणार आहे.

भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
एलॉन मस्कच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीसाठी हा एक मोठा टप्पा आहे. मॉडेल वाय सध्या जगातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे आणि ती टेस्लाचे भारतातील पहिले उत्पादन असेल.
अमेरिकेतील उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला या कंपनीच्या कार आता भारतात मिळणार आहेत. देशातील पहिले शोरूम १५ जुलै रोजी सुरू होणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे अधिकृतपणे हे शोरूम उघडणार आहे. एलॉन मस्क यांच्या इलेक्ट्रिक वाहन कंपनीसाठी ही एक मोठी उपलब्धी आहे.
या शोरूममध्ये ग्राहकांना मॉडेलच्या किमती, व्हेरिएंट पर्याय आणि कॉन्फिगरेशन टूल्सची सुविधा उपलब्ध होईल. एवढेच नाही तर पुढील आठवड्यात वाहनांचे बुकिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी ऑगस्टच्या अखेरीस डिलिव्हरी सुरू करू शकते.
मॉडेल Y सर्वात आधी लाँच केले जाणार
टेस्लाने चीनमधील त्यांच्या कारखान्यातून मॉडेल Y रियर-व्हील ड्राइव्ह युनिट्सची पहिली बॅच आधीच आणली आहे. मॉडेल Y सध्या जगातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार आहे आणि ती टेस्लाचे भारतातील पहिले उत्पादन असणार आहे.
मॉडेल Y ची किंमत
मॉडेल Y ची किंमत २७.७ लाख रुपये आहे. पण आयातीनंतर, भारतात या इलेक्ट्रिक वाहनांची किंमत खूप जास्त असण्याची अपेक्षा आहे. कारण भारतात, ४०,००० डॉलर पेक्षा कमी किमतीच्या पूर्णपणे तयार केलेल्या इलेक्ट्रिक वाहनांवर ७० टक्के आयात शुल्क आहे. यानंतर, पुढील शुल्कानंतर, मॉडेल Y ची किंमत अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या ४६,६३० डॉलर पेक्षा खूपच जास्त असू शकते.
टेस्लाचे भारतातील दुसरे शोरूम जुलैच्या अखेरीस नवी दिल्लीत सुरू होणार आहे. मुंबईतील आउटलेट पहिल्या आठवड्यात व्हीआयपी आणि व्यावसायिक भागीदारांसाठी खुले असेल, तर पुढील आठवड्यापासून ते सर्वसामान्यांसाठी खुले होऊ शकते. टेस्ला Y मॉडेलची ही कार आकारमानात बरीच व्यावहारिक आहे. तिची लांबी सुमारे ४,७९७ मिमी आहे, तर रुंदी सुमारे १,९८२ मिमी आहे. यामध्ये साइड मिरर फोल्ड केलेले आहेत. तर तीची उंची सुमारे १,६२४ मिमी पर्यंत जाते. ग्राउंड क्लीयरन्स १६७ मिमी ठेवण्यात आला आहे. हे भारतीय रस्स्तांसाठी उत्तम आहे.