Tata Motors ची आणखी एक इलेक्ट्रिक कार लाँच, सिंगल चार्जमध्ये होईल 'इतका' प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 02:48 PM2021-08-31T14:48:51+5:302021-08-31T15:02:46+5:30

tata tigor ev launched in india : टाटा टिगोर इलेक्ट्रिक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

tata tigor ev launched in india price safety features variants | Tata Motors ची आणखी एक इलेक्ट्रिक कार लाँच, सिंगल चार्जमध्ये होईल 'इतका' प्रवास

Tata Motors ची आणखी एक इलेक्ट्रिक कार लाँच, सिंगल चार्जमध्ये होईल 'इतका' प्रवास

googlenewsNext

टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतीय बाजारात आणखी एक इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन कंपनीने टाटा टिगोरचे इलेक्ट्रिक व्हर्जन (Tata Tigor EV) सुरू केले आहे. टाटा टिगोर इलेक्ट्रिकची सुरुवातीची किंमत 11.99 लाख रुपये आहे.

टाटा टिगोर इलेक्ट्रिक तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे. टिगोर ईव्ही ही जिप्ट्रॉन टेक्‍नेलॉजीवर (Ziptron technology) आधारित आहे. याआधीची टाटा नेक्सन TATA NEXON इलेक्ट्रिक कार जिप्ट्रॉन टेक्‍नेलॉजीवर  आधारित आहे. टाटा मोटर्सच्या आता भारतीय बाजारात दोन इलेक्ट्रिक कार आहेत. जिप्ट्रॉन टेक्‍नेलॉजीचे वैशिष्ट्य म्हणजे याला लिथियम-आयन बॅटरीला कायमस्वरूपी मॅग्नेट एसी मोटरशी जोडलेले आहे, ज्यामुळे कारला सतत करंटचा सप्लाय करते. त्याचा बॅटरी पॅक देखील डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ आहे.

या इलेक्टिक कारच्या किंमतीबाब बोलायचे झाल्यास, Tata Tigor EV XE ची किंमत 11.99 लाख रुपये, Tata Tigor EV XM साठी 12.49 लाख रुपये आणि Tata Tigor EV XZ+ ची किंमत 12.99 लाख रुपये असेल. टाटा मोटर्सने 18 ऑगस्ट रोजी नवीन टिगोर ईव्हीचे (New Tata Tigor EV) अनावरण केले.

टाटा टिगोर इलेक्ट्रिक (Tata Tigor Electric)  कार पूर्णपणे चार्ज झाल्यावर 306 किलोमीटरपर्यंत धावेल. ही कारची ARAI-certified रेंज आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, इलेक्ट्रिक कारचा वेग केवळ 5.7 सेकंदात 0.60 kmph इतका आहे. तुम्ही दिल्लीते नैनितालपर्यंतचा प्रवास सिंगल चार्जमध्ये करू शकता. दिल्ली ते नैनिताल हे अंतर सुमारे 303 किलोमीटर आहे.


टाटाच्या इलेक्ट्रिक कारमध्ये 55 kW इलेक्ट्रिक मोटर आणि 26kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे, जे 74bhp (55kW) पर्यंत पॉवर आणि 170Nm पर्यंत टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असेल. टाटा ही इलेक्ट्रिक कार फास्ट चार्जरच्या मदतीने 1 तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते. दुसरीकडे, रेग्युलर चार्जर म्हणजेच होम चार्जिंगमध्ये सुमारे 8.5 तासांत 0 ते 80 टक्के चार्ज होईल.

नवीन टाटा टिगोर ईव्हीमध्ये हिल एक्सेंट, हिल डिसेंट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्स, ABS with EBD सह CSC म्हणजेच कॉर्नरिंग स्टॅबिलिटी कंट्रोल असे फिचर्स मिळतील. टाटा मोटर्सचा असा दावा आहे की, नवीन टिगोर ईव्ही ही देशातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक सेडान कार असेल. टाटा टिगोर ईव्ही केवळ 21,000 रुपयांत बुक करता येईल.
 

Web Title: tata tigor ev launched in india price safety features variants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.