शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

TATA च्या 'या' परवडणाऱ्या CNG कार 19 जानेवारीला होणार लाँच!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 2:23 PM

tata tigor cng : लॉन्च झाल्यानंतर, टाटा टिगोर ही एकमेव कॉम्पॅक्ट सेडान असेल जी सामान्य इंजिन, सीएनजी आणि इलेक्ट्रिक तीनही मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल.

नवी दिल्ली : टाटा मोटर्स (Tata Motors) आपल्या दोन लोकप्रिय कारटाटा टियागो (Tata Tiago) आणि टाटा टिगोर (Tata Tigor) आता  CNG व्हेरिएंटमध्ये आणणार आहे. 19 जानेवारी रोजी टाटा मोटर्स या कार लॉन्च करणार आहे. अलीकडेच, टिगोर सीएनजी कोणत्याही स्टिकर्सशिवाय डीलरशिप यार्डमध्ये उभी केलेली दिसली. लॉन्च झाल्यानंतर, टाटा टिगोर ही एकमेव कॉम्पॅक्ट सेडान असेल जी सामान्य इंजिन, सीएनजी आणि इलेक्ट्रिक तीनही मॉडेल्समध्ये उपलब्ध असेल.

डीलरशिपच्या सुत्रांच्या म्हणण्यानुसार, टिगोर सीएनजी 3 व्हेरिएंटमध्ये आणली जाणार आहे. दरम्यान, फोटोमध्ये कारचे डिझाइन सध्याच्या मॉडेलसारखेच असल्याचे दिसते. हे कारचे खालचे वेरिएंट आहे, ज्याला 15-इंच अलॉय व्हील आणि i-CNG बॅज देण्यात आला आहे.  टाटा टियागो आणि टाटा टिगोरचे सीएनएक्स मॉडेल्स आता अधिक किमतीचे असणार आहेत. या दोन्ही कारचे बुकिंगही अनधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे आणि शहर आणि डीलरशीपनुसार 5,000 आणि 11,000 रुपयांमध्ये दोन्ही सीएनजी मॉडेल्सची बुकिंग करता येईल.

सध्या टाटा टियागो आणि टाटा टिगोरसोबत, कंपनीने 1.2-लीटर तीन-सिलेंडर रेवेट्रॉन पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 86 हॉर्सपॉवर आणि 113 एनएम पीक टॉर्क बनवते. दोन्ही कारचे सीएनजी व्हेरिएंट देखील समान क्षमतेसह येऊ शकतात किंवा यामध्ये थोडीशी घसरण दिसू शकते. कंपनीने दोन्ही कारसाठी मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्स पर्याय दिले आहेत, जरी फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन सीएनजी व्हेरिएंटमध्ये आढळू शकते.

टाटा टियागो सीएनजी आणि टाटा टिगोर सीएनजीसह, कंपनी या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकी आणि ह्युंदाईला टक्कर देणार आहे. सध्या, मारुतीकडे बाजारात सर्वात मोठी सीएनजी रेन्ज आहे, जी ऑल्टो सीएनजीपासून सुरू होते आणि Ertiga सीएनजीपर्यंत जाते. ह्युंदाईने सेंट्रो सीएनजीपासून ह्युंदाई ऑरा सीएनजीपर्यंत बाजारात लॉन्च केले आहे. अशा परिस्थितीत टाटा टियागो आणि टिगोर सीएनजी बाजारात येताच स्पर्धा वाढणार आहे. या दोन्ही सीएनजी व्हेरिएंटसोबत टाटा या सेगमेंटमध्ये जोरदार स्पर्धा करणार आहे.

सरकार सीएनजी वाहनांना देतंय प्रोत्साहन या सर्व कंपन्यांनी सीएनजी व्हेरिएंटमध्ये वाहने सादर करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि यामुळेच ग्राहक आता फॅक्टरी-फिट केलेल्या सीएनजी कार घेण्यास मोठी उत्सुकता दाखवत आहेत. भारत सरकार सीएनजी वाहनांनाही प्रोत्साहन देत आहे, कारण ते केवळ किफायतशीर नाहीत, तर त्यांच्या वापरामुळे इंधनाची आयातही कमी होईल. दरम्यान, या दोन्ही परवडणाऱ्या कार भारतात खूप पसंत केल्या जात आहेत आणि त्यांचे सीएनजी व्हेरिएंट ग्राहकांसाठी अधिक परवडणारे ठरणार आहेत. 

टॅग्स :Tataटाटाcarकार