शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
2
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
3
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
4
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
6
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
7
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
8
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
9
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...
10
'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा
11
IND vs WI 2nd Test Day 2 Stumps: टीम इंडिया पुन्हा तिसऱ्या दिवशीच कॅरेबियन पाहुण्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' करणार?
12
Diwali Astro 2025: दिवाळीच्या प्रकाशपर्वात भाग्य उजळणार! राशीनुसार पहा आनंद आणि ऐश्वर्य योग!
13
वीरेंद्र सेहवागची पत्नी करतेय बीसीसीआय अध्यक्षांना डेट? सोशल मीडियावर अफवांचं वादळ, तो फोटो ठरतोय कारण
14
भारताच्या शस्त्रांपुढे पाकिस्तानचे काहीच चालणार नाही; कितीही साठा वाढवला तरीही उपयोग नाही
15
'डेंजर झोन'मध्ये साई सुदर्शननं घेतला जबरदस्त No Look Catch! कॅरेबियन बॅटरसह सगळेच शॉक (VIDEO)
16
"मोदी सरकारने अदानीच्या कल्याणमधील सिमेंट कंपनीसाठी सर्व नियम बदलले", काँग्रेसचा गंभीर आरोप
17
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोदी सरकारचे मोठे गिफ्ट; लॉन्च केल्या ₹35,440 कोटींच्या दोन योजना...
18
बँकांत तब्बल १७६ कोटी रुपये पडून, तुमचे तर नाहीत ना? मालकच मिळेनात, १० वर्षांपासून ग्राहक फिरकले नाहीत, पैसे नेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
19
बिहारमध्ये काँग्रेसचं टेन्शन वाढलं...! 57 पेक्षा जास्त जागा द्यायला लालूंचा नकार; आता काय होणार?
20
पैशांसाठी पोलिसांची हैवानियत! पास झाला म्हणून पार्टी करणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण; पॅनक्रियाज हॅमरेजने मृत्यू

नव्या रुपात परततेय Tata Sierra! पेट्रोल, डिझेल, EV व्हर्जनमध्ये होणार लाँच; थेट Creta, Seltos सारख्या कारला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:33 IST

ही कार 1990 च्या दशकात ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती...

टाटा मोटर्स आपली आयकॉनिक आणि क्लासिक SUV Tata Sierra पुन्हा एकदा भारतीय बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. ही कार 1990 च्या दशकात ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती. आता ती आधुनिक डिझाइन आणि मल्टी-पावरट्रेन तंत्रज्ञानासह नव्या रुपात येत आहे. यासंदर्भात खुद्द टाटा मोटर्सनेच पुष्टी केली आहे की, 2030 पर्यंत सात नवीन मॉडेल्स लॉन्च केली जातील, यापैकी पहिली एसयूव्ही टाटा सिएरा 2025 असेल, असे कंपनीने म्हटले आहे. ही कार ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, मारुती ग्रँड विटारा आणि मारुती व्हिक्टोरिस यांना थेट टक्कर देईल.

तीन पर्यायांमध्ये असेल सिएरा -ही नवीन सिएरा विविध इंजिन पर्यायांसह उपलब्ध असेल. यात 1.5-लिटर नॅच्युरली-एस्पिरेटेड पेट्रोल, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल (TGDi) आणि 2.0-लिटर क्रायोटेक डिझेल इंजनचा समावेश आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक व्हर्जन (EV) देखील येणार असून, त्यात 65kWh आणि 75kWh बॅटरी पॅक असतील. पेट्रोल आणि डिझेल व्हर्जन नोव्हेंबर 2025 मध्ये, तर इलेक्ट्रिक व्हर्जन जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

असे असेल इंजिन - या कारसोबत देण्यात येणारे, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजन 170 बीएचपी पॉवर आणि 280 एनएम टॉर्क देईल, तर डिझेल इंजिन 170 बीएचपी आणि 350 एनएम टॉर्क प्रदान करेल. दोन्ही इंजिन्सना 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय मिळेल. इलेक्ट्रिक व्हर्जनची रेंज 500 किमीपेक्षा जास्त असेल, आणि 75kWh बॅटरीसह AWD पर्याय उपलब्ध असेल.

डिझाइन आणि वैशिष्ट्येनवीन Sierra चे डिझाइन साधारणपणे, जुन्या क्लासिक लूक प्रमाणेच आहे. मात्र ते आधुनिक आणि फ्युचरिस्टिक आहे. यात LED DRLs, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, पॅनोरमिक सनरूफ, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार तंत्रज्ञान, ADAS, प्रीमियम इंटीरियर आणि प्रशस्त सीटिंग यासारखी वैशिष्ट्ये असतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Tata Sierra Returns: Petrol, Diesel, EV Options Challenge Creta, Seltos

Web Summary : Tata Sierra, a classic SUV, is set to relaunch in India with petrol, diesel, and EV options. Expected in 2025, it will rival Hyundai Creta and Kia Seltos. Engine choices include 1.5L petrol, 2.0L diesel, and electric versions offering over 500km range. It features modern design and advanced technology.
टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर