टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:36 IST2026-04-06T17:34:41+5:302026-04-06T17:36:20+5:30

आता टाटा पंच ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली आहे...

Tata Punch's explosion Overtaking Nexon to become the country's number-1 SUV See the list of top 10 cars | टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी

टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी


सध्य भारतीय बाजारात एसयूव्ही (SUV) वाहनांची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. मार्च २०२६ च्या सेल्स रिपोर्टनुसार, टाटा मोटर्सच्या Tata Punch Facelift ने विक्रीच्या बाबतीत स्वतःच्याच टाटा नेक्सॉनलाही मागे टाकले आहे. आता टाटा पंच ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV ठरली आहे.

टाटा पंच नंबर 1 -
अहवालानुसार, टाटा पंचने मार्चमध्ये २०९७७ युनिट्सची विक्री नोंदवली, तर टाटा नेक्सॉन १९,८१० युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर राहिली. १७८३८ युनिट्सह तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ह्युंदाई क्रेटाचा विचार करता, हिच्या एकूण विक्रीत काहीशी घट झाली आहे. मात्र ४ मीटरपेक्षा मोठ्या SUV सेगमेंटमध्ये ती अजूनही पहिल्या क्रमांकावरच आहे.

मारुती सुझुकीची ब्रेझा (१६,००० युनिट्स) आणि फ्रॉन्क्स (१५,००० युनिट्स) देखील स्पर्धेत टिकून आहेत. महिंद्रा स्कॉर्पिओ-एन आणि किया सोनेट यांनीही अनुक्रमे १४,५०० आणि १२,००० हून अधिक युनिट्सची विक्री केली आहे. याशिवाय ह्युंदाई वेन्यू, व्हिक्टोरिस आणि किया सेल्टोस यांसारख्या मॉडल्सनीही ११,००० युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे.

पंच फेसलिफ्टचे पॉवर आणि फीचर्स
टाटा पंचच्या या यशाचे मुख्य कारण तिचे नवीन अपडेट्स आहेत. यामध्ये १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते १२० bhp पॉवर आणि १७० Nm टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हेरिएंटमध्ये एएमटी (AMT) ऑप्शन आणि पॅडल शिफ्टर्सचा समावेश करण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी ६ एअरबॅग्स, ३६० डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर यांसारखे फीचर्स दिले आहेत. नवीन डॅशबोर्ड, डिजिटल क्लस्टर आणि इल्युमिनेटेड टाटा लोगो असलेला टू-स्पोक स्टीयरिंग व्हील यामुळे ही गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे.

 

Web Title : टाटा पंच ने नेक्सन को पछाड़ा, बनी भारत की नंबर-1 एसयूवी: टॉप 10 कारें

Web Summary : टाटा पंच ने मार्च में नेक्सन को पछाड़कर भारत की सबसे ज्यादा बिकने वाली एसयूवी बन गई। पंच ने 20,977 यूनिट्स बेचे, जिसके बाद नेक्सन (19,810) और हुंडई क्रेटा (17,838) का स्थान रहा। मारुति ब्रेज़ा और फ्रोंक्स ने भी अच्छा प्रदर्शन किया। पंच की सफलता का श्रेय इसके अपडेटेड फीचर्स और शक्तिशाली इंजन को जाता है।

Web Title : Tata Punch overtakes Nexon, becomes India's top SUV: Top 10 cars.

Web Summary : Tata Punch surpassed Nexon to become India's best-selling SUV in March. Punch sold 20,977 units, followed by Nexon (19,810) and Hyundai Creta (17,838). Maruti Brezza and Fronx also performed well. Punch's success is attributed to its updated features and powerful engine.