Tata Punch चा गेम करणार Hyundai ची ही नवी छोटी स्वस्तातली SUV; किंमत असेल फक्त एवढी! जाणून घ्या फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 14:51 IST2023-03-13T14:47:26+5:302023-03-13T14:51:02+5:30

आता लवकरच पंचला थेट टक्कर देण्यासाठी नवीन मायक्रो एसयूव्ही बाजारात येण्याची शक्यता आहे. ही SUV Hyundai ची असेल. Hyundai मायक्रो SUV सेगमेंटवर काम करत आहे.

tata punch rival hyundai micro suv ai3 know about price and features | Tata Punch चा गेम करणार Hyundai ची ही नवी छोटी स्वस्तातली SUV; किंमत असेल फक्त एवढी! जाणून घ्या फीचर्स

Tata Punch चा गेम करणार Hyundai ची ही नवी छोटी स्वस्तातली SUV; किंमत असेल फक्त एवढी! जाणून घ्या फीचर्स

भारतात मायक्रो एसयूव्ही सेगमेंट लोकप्रिय करण्याचे खरे श्रेय हे टाटा पंचलाच जाते. देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कारमध्येटाटा पंचचा समावेश आहे. मात्र आता लवकरच पंचला थेट टक्कर देण्यासाठी नवीन मायक्रो एसयूव्ही बाजारात येण्याची शक्यता आहे. ही SUV Hyundai ची असेल. Hyundai मायक्रो SUV सेगमेंटवर काम करत आहे. ही एसयूव्ही भारतात लॉन्च झाल्यास Tata Panch ला थेट टक्कर देईल. तसेच, ग्राहकांना एक नवा पर्यायही देईल.

Hyundai आपली नवीन मायक्रो SUV (कोडनेम - Hyundai Ai3) याच वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करेल, अशी अपेक्षा आहे. या नवीन Hyundai micro SUV ची किंमत 6 लाख ते 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) या रेन्जमध्ये असण्याची शक्यता आहे. ही कार पंच शिवाय,  Maruti Ignis, Renault Kiger आणि Nissan Magnite सारख्या कारलाही टक्कर देईल.

नव्या स्पाय शॉट्सकडून समजते की, Hyundai Ai3 SUV ला एच-शेपचे लाइट एलिमेंट असलेले प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि एच-शेप असलेल्या डिझाइन एलिमेंटसह टेललॅम्पदेखील असतील. यात एलईडी डीआरएल, सर्क्युलर फॉग लॅम्प आणि अलॉय व्हीलही असतील. 

खरे तर, SUV च्या या व्हेरिअंटमध्ये स्टील व्हील दिले जाऊ शकतात. याशिवाय, अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र यात फ्री-स्टॅडिंग टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, सेमी डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, कनेक्टेड कार टेक, ऑटोमॅटिक एसी युनिट आणि सिंगल पेन सनरूफ सारखे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात.

Web Title: tata punch rival hyundai micro suv ai3 know about price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.