Tata Safty: 'टाटा'ची ताकद! भीषण अपघातात अनेकदा उलटली Tata Punch, पण कारमधील एकाही व्यक्तीला दुखापत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 16:30 IST2022-07-27T16:22:59+5:302022-07-27T16:30:33+5:30
Tata Safty: टाटा कंपनीच्या कार सुरक्षिततेच्या बाबतीत अव्वल क्रमांकाच्या कार म्हणून ओळखल्या जातात. सध्या Tata Punch कारची बाजारात खूप चलती आहे.

Tata Safty: 'टाटा'ची ताकद! भीषण अपघातात अनेकदा उलटली Tata Punch, पण कारमधील एकाही व्यक्तीला दुखापत नाही!
Tata Safty: टाटा कंपनीच्या कार सुरक्षिततेच्या बाबतीत अव्वल क्रमांकाच्या कार म्हणून ओळखल्या जातात. सध्या Tata Punch कारची बाजारात खूप चलती आहे. कारला ग्राहकांची तुफान पसंती मिळत आहे. यातच एका ग्राहकानं टाटा पंचच्या अपघाताचे फोटो शेअर करत कारच्या सुरक्षिततेबाबत माहिती शेअर केली आहे. टाटा पंच कारचा मालक असलेल्या या युझरसोबत घडलेल्या अपघाताचा प्रसंग त्यानं कथन केला आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला, कार अनेकदा उलटली पण आत बसलेल्या एकाही व्यक्तीला गंभीर दुखापत झाली नाही, अशी माहिती या युझरनं शेअर केली आहे.
टाटा कार युझरनं टाटा कंपनीला टॅग करत फेसबुकवर पोस्ट लिहीली आहे. यात कारचा चक्काचूर झालेला फोटो पोस्ट केला आहे. कारची अवस्था पाहूनच अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. पण इतक्या भीषण अपघातातही आपलं कुटुंब सुखरूप बाहेर पडलं असं कार चालकानं सांगितलं आहे. टाटा पंच कारला ग्लोबल एनकॅप सेफ्टी रेटिंगमध्ये पाच स्टार मिळाले आहेत. तसंच कारमध्ये स्टार्ट-स्टॉप ट्रॅक्शन प्रो मोड्स देण्यात आले आहेत. त्यामुळे चालकाला ऑफ रोड कॅपेबिलीटी प्राप्त होते. टाटा पंच कार एक सुरक्षित कार म्हणून ओळखली जात आहे.
गेल्या वर्षी लॉन्चिंग
टाटा पंच कार कंपनीने गेल्या वर्षाच्या अखेरीस सादर केली होती. सेगमेंटमधील सर्वात स्वस्त SUV कार आहे. देशांतर्गत ऑटोमेकर टाटा मोटर्सने तयार केलेल्या मासिक विक्री अहवालात टाटा पंचला टॉप-10 मध्ये स्थान मिळाले आहे. सध्याची सुरुवातीची किंमत 5.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे, तर टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
टाटा पंच कारचे सेफ्टी रेटिंग
टाटा पंच कारच्या विक्रीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे तिची उच्च श्रेणीची वैशिष्ट्ये आणि परवडणाऱ्या श्रेणीतील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुरक्षा. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यू कार असेसमेंट प्रोग्राम अंतर्गत, नवीन कार अनेक प्रक्रियांद्वारे क्रॅश केली जाते, त्यानंतर तिला सुरक्षा रेटिंग दिले जाते. ग्लोबल एनसीएपी अंतर्गत, प्रौढ सुरक्षेमध्ये याला फाइव्ह स्टार रेटिंग आणि बाल सुरक्षा वैशिष्ट्यांमध्ये ४ स्टार रेटिंग मिळालं आहे.
टाटा पंचचे फिचर्स
टाटा पंचच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1.2 लीटरचे तीन सिलेंडर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिन आहे. ही कार 86 hp चा पॉवर आणि 113 Nm टॉर्क देऊ शकते. यात 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. याव्यतिरिक्त, यात पाच-स्पीड एएमटी ट्रान्समिशन देखील आहे.
टाटा पंचमध्ये उत्तम ग्राउंड क्लीयरन्स
टाटा पंच कारचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला आहे, जो 187 मिमी आहे. चांगल्या ग्राउंड क्लिअरन्सच्या मदतीने कार खडबडीत रस्त्यांवर सहज मात करू शकते. ही एसयूव्ही सेगमेंटची कार आहे.