Tata आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत; येणार 4WD इलेक्ट्रीक SUV, पाहा काय आहे खास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 14:45 IST2022-04-15T14:44:48+5:302022-04-15T14:45:04+5:30
टाटा मोटर्स (TATA Motors) इलेक्ट्रीक वाहनांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे आणि लवकरच आणखी एक मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

Tata आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत; येणार 4WD इलेक्ट्रीक SUV, पाहा काय आहे खास
TATA Electric SUV : टाटा मोटर्स (TATA Motors) इलेक्ट्रीक वाहनांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे आणि लवकरच आणखी एक मोठी घोषणादेखील करू शकते. कंपनी सध्या फक्त फ्रंट व्हील ड्राइव्ह कार आणि एसयूव्हीची विक्री करते. नव्या मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी ऑल-व्हील ड्राइव्ह (4WD) सुविधेसह इलेक्ट्रीक कार आणण्याच्या विचारात आहे. टाटा ने नुकतीच Curvv SUV संकल्पना सादर केली होती, ज्याचं प्रोडक्शन मॉडेल 2024 मध्ये लॉन्च केले जाईल.
"कंपनीला एक इलेक्ट्रीफाईड ऑल ड्राईव्ह मॉडेल आणण्याची इच्छा आहे. कंपनी 4WD सिस्टम असलेल्या अनेक एसयूव्हीवर काम करत आहे," अशी माहिती टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेईकल आणि टाटा पॅसेंजर्स इलेक्ट्रीक मोबिलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर शैलेंद्र चंद्र यांनी Zigwheels शी बोलताना दिली. जर मार्केट सर्व्हेमध्ये याला चांगली डिमांड दिसून आली तर आम्ही ते बाजारात आणू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं.
नुकतीच सादर करण्यात आलेली Tata Curvv Coupe SUV चं कॉन्सेप्ट व्हर्जन जनरेशन 2 आर्किटेक्चरवर आधारित आहे. यात अनेक पॉवरट्रेन आणि ड्राइव्ह सिस्टम सपोर्ट करत असल्याचा दावा कंपनीनं केलाय. या प्लॅटफॉर्मचा वापर कंपनी AWD इलेक्ट्रीक एसयूव्हीसाठी करू शकते. याशिवाय सफारीचा प्लॅटफॉर्म AWD सिस्टमसाठी सक्षम असल्याची माहिती कंपनीनं यापूर्वीच दिली आहे.