शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक SUV झाली महाग, जाणून घ्या नवीन किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:53 IST

Tata Nexon EV : देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) आणखी महाग झाली आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल कारपेक्षा इलेक्ट्रिक कार आधीच महाग आहेत. दरम्यान, आता देशातील सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार टाटा नेक्सॉन ईव्ही (Tata Nexon EV) आणखी महाग झाली आहे.

टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या  Tata Nexon EV कारची किंमत 25000 रुपयांनी वाढवली आहे. ही दरवाढ सर्व व्हेरिएंट्सच्या किमतींवर लागू करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या Tata Nexon EV पाच व्हेरिएंट्समध्ये येते. यात XM, XZ Plus, XZ Plus Luxury, Dark XZ Plus आणि Dark XZ Plus Luxury व्हेरिएंट आहेत. या सर्वच व्हेरिएंट्सच्या किंमती वाढल्या आहेत.

Tata Nexon EV ची सुरुवातीला किंमत 14.29 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू झाली होती, जी आता 14.54 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम)  सुरू होते. ही कारच्या बेस व्हेरिएंट XM ची किंमत आहे. तसेच, Tata Nexon EV च्या  Dark XZ Plus Luxury  व्हेरिएंटची किंमत 17.15 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे, जी आधी 16.90 लाख रुपये होती. दरम्यान, जवळपास दोन वर्षांपूर्वी लॉन्च झाल्यापासून कंपनीने Tata Nexon EV च्या 13,500 हून अधिक युनिट्स विकल्या आहेत.

Tata Nexon EV चे स्पेसिफिकेशन्सTata Nexon EV ला पर्मनेंट मॅन्गेट एसी मोटर मिळते, जी 245 Nm पीक टॉर्क जनरेट करते. यात IP67 प्रमाणित 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरी आहे, जी फास्ट चार्जरने 1 तासात 80 टक्क्यांपर्यंत चार्ज केली जाऊ शकते. ही कार 9.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. कारची रेंज 300 किमीच्या जवळपास आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, टाटा आपल्या Nexon EV ची रेंज वाढवण्याचे काम करत आहे. यासाठी अपडेटेड नेक्सॉनमध्ये मोठा बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, कारमध्ये 40kWh बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो, ज्यामुळे त्याची ड्रायव्हिंग रेंज 400 च्या पुढे जाऊ शकते. 

टॅग्स :Tataटाटाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनbusinessव्यवसाय