शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

जगात भारी; टाटाच्या कारला 'क्रॅश टेस्ट'मध्ये फाईव्ह स्टार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 8:39 AM

टाटा मोटार्स दिवसेंदिवस दर्जेदार गाड्या बाजारात आणत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ठळक मुद्दे टाटा मोटर्स दिवसेंदिवस दर्जेदार गाड्या बाजारात आणत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटाची अल्ट्रॉज कारसुद्धा भारतीय बाजारात 22 जानेवारीला लाँच होणार आहे. टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz)ला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Global NCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळालं आहे.

नवी दिल्लीः टाटा मोटर्स दिवसेंदिवस दर्जेदार गाड्या बाजारात आणत असून, त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटाची अल्ट्रॉज कारसुद्धा भारतीय बाजारात 22 जानेवारीला लाँच होणार आहे. पण तत्पूर्वीच गाडीसंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz)ला ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (Global NCAP) क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळालं आहे. टाटा कंपनीसाठी हे मोठं यश आहे. खरं तर टाटा मोटर्सची अल्ट्रॉज ही दुसरी कार आहे, ज्या कारला ग्लोबल NCAPच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तत्पूर्वी नेक्सॉनला ग्लोबल NCAPच्या क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग बहाल करण्यात आलं होतं. ग्लोबल NCAPनं टाटा अल्ट्रॉजला सुरक्षेसाठी 17 पैकी 16.13 अंक दिले आहेत. अल्ट्रॉजला प्रौढ प्रवासी संरक्षणामध्ये 17 पैकी 16.13 अंक मिळाल्यानं ती टाटा मोटर्ससाठी जमेची बाजू आहे. क्रॅश टेस्टदरम्यान टाटा अल्ट्रॉजनं चालक आणि पुढच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाचं डोकं, मान आणि गुडघ्यांची चांगल्या पद्धतीनं सुरक्षा केली. त्यामुळेच क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळालं आहे. चाइल्ड प्रोटेक्शन क्रॅश टेस्टदरम्यान 1.5 वर्षांच्या डमी बाळाचीही सुरक्षा चांगली पद्धतीनं झाल्याचं समोर आलं आहे. परंतु क्रॅश टेस्टदरम्यान 3 वर्षांच्या मुलाच्या डमीची लावण्यात आलेली चाइल्ड सीट उघड झाली. त्यामुळे डमीचं डोकं कारच्या इंटिरियरला धडकलं. त्यामुळे काहीशी अंकात कपात आली. बाल संरक्षणात कारला 49पैकी 29 अंक देण्यात आले आहेत. त्यामुळे बाल संरक्षणात या कारला 3-स्टार रेटिंग बहाल करण्यात आलं आहे.  

टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz) खरेदी करायची असल्यास त्याची प्री-बुकिंग डिसेंबर 2019पासून सुरू झाली आहे. देशभरात टाटा मोटर्सच्या डीलरच्या माध्यमातून कारचं प्री-बुकिंग केलं जातं. या कारची डिलिव्हरी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. Altrozची किंमत 5 ते 8 लाख रुपयांदरम्यान असण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय बाजारात टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz)चा सामना ह्युंदाई एलिट आय 20, मारुती बलेनो, टोयोटा ग्लँजा आणि होंजा जॅज सारख्या कारबरोबर होणार आहे. अल्ट्रॉजमध्ये ड्युएअ फ्रंट एअरबॅग्स, ईबीडीबरोबरच एबीएस, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, सीटबेल्ट रिमाइंडर, स्पीड अलार्म सिस्टीम आणि Isofix चाइल्ड सीट अँकरेजसारखे फीचर देण्यात आले आहेत. 
अल्ट्रॉजमध्ये बीएस 6 युक्त पेट्रोल आणि डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. कारच्या इंजिनमध्ये तीन पर्याय उपलब्ध असल्याचीही चर्चा आहे. एक टियागोमध्ये दिलेलं 85hp पॉवरचं 1.2-लीटरचं पेट्रोल इंजिन आणि दुसरं नेक्सॉनमध्ये दिलेलं 102hp पॉवरचं 1.2-लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. तिसरं 90hp पॉवरचं 1.5-लीटर टर्बो डिझेल इंजिन राहणार आहे. तिन्ही इंजिनबरोबर 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय काही काळानंतर देण्याची शक्यता आहे. फीचर्समध्ये फ्री स्टँडिंग 7 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्लेबरोबरच टाटा हॅरिअरसारखं डिजिटल इन्स्ट्रुमेंटही देण्यात आलं आहे.   

टॅग्स :Tataटाटा