Tata ची कमाल, बाजारात आणली स्वस्त सनरूफवाली इलेक्ट्रिक कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:44 PM2023-07-22T17:44:12+5:302023-07-22T17:44:48+5:30

कंपनीने अलीकडेच Tata Altroz कार  XM आणि XM(S) या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. 

tata altroz affordable premium hatchback car sunroof tata altroz with sunroof | Tata ची कमाल, बाजारात आणली स्वस्त सनरूफवाली इलेक्ट्रिक कार!

Tata ची कमाल, बाजारात आणली स्वस्त सनरूफवाली इलेक्ट्रिक कार!

googlenewsNext

नवी दिल्ली : सध्या विविध फिचर्स असणाऱ्या कारचा जमाना आहे. अनेक फिचर्स असलेल्या कारकडे ग्राहकांचा ओढा आहे. त्यातच सनरुफ कारची (Sunroof Car) तर बच्चेकंपनीपासून सर्वांनाच क्रेझ आहे. हेच हेरुन अनेक कंपन्यांनी सनरुफ कार बाजारात उतरविल्या. सर्वात स्वस्त सनरुफ कार बाजारात येत आहेत. दरम्यान, टाटा ही भारतीय बाजारपेठेतील कार विकणारी सर्वात मोठी कंपनी आहे. बजेट आणि डिझाईनमुळे लोकांना टाटाच्या गाड्या जास्त आवडतात. कंपनीने अलीकडेच Tata Altroz कार  XM आणि XM(S) या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केली आहे. 

या कारमध्ये किफायतशीर किमतीत इलेक्ट्रिक सनरूफ मिळते. या कारची एक्स-शोरूम किंमत 7.35 लाख रुपये आहे.  XM(S) XM आणि XM+ व्हेरिएंट दरम्यान आहे. नवीन व्हेरिएंट XM अनेक शानदार फीचर्ससह येते आणि कारला इलेक्ट्रिक सनरूफ देखील मिळते. XM ट्रिमपेक्षा कारची किंमत 45,000 रुपयांनी जास्त आहे. सनरूफ व्यतिरिक्त, व्हेरिएंटमध्ये R16 व्हील कव्हर्स, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, इलेक्ट्रिक फोल्डेबल आउट साइड-रिअर व्ह्यू मिरर, प्रीमियम रूफलाइन, रिमोट कीलेस एंट्री, मोबाइल डिव्हाइस चार्ज करण्यासाठी फ्रंट यूएसबी पोर्ट आणि हेडलॅमसाठी फॉलो-मी-होम देखील मिळते.

सुरक्षिततेच्या दृष्टीने कारला ड्युअल एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, कॉर्नरिंग स्टेबिलिटी कंट्रोल, ब्रेक स्वे कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर्स आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट मिळते. इंजिनबद्दल सांगायचे झाल्यास  XM (S) व्हेरिएंट फक्त 1.2-लिटर, तीन-सिलिंडर, नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह येते. जे 6,000 rpm वर 86 bhp आणि 3,250 rpm वर 115 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहे. या कारमध्ये तुम्हाला दोन ड्राइव्ह मोड मिळतात. एवढेच नाही तर स्टार्ट/स्टॉपचा पर्यायही यामध्ये उपलब्ध आहे.

याचबरोबर, नवीन XM(S) व्हेरिएंटव्यतिरिक्त, टाटा कंपनीने Altroz ​​च्या इतर व्हेरिएंटमध्ये देखील बदल केले आहेत. XE व्हेरिएंट आता मागील पॉवर विंडो आणि फॉलो-मी होम लॅम्पसह रिमोट कीलेस एंट्रीसह येईल. XM+/XM+S रिव्हर्स कॅमेरा, ड्रायव्हर सीट, क्रूझ कंट्रोल, टॉप-एंड डॅशबोर्डने सुसज्ज असेल. XT ट्रिमला ड्रायव्हर सीट हाईट अॅडजस्टर, R16 हायपर स्टाइल व्हील आणि मागील डिफॉगर मिळेल.
 

Web Title: tata altroz affordable premium hatchback car sunroof tata altroz with sunroof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.