सुझकीची 'ही' मोटरसायकल दोन लाखाने झाली स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 11:07 IST2018-03-23T20:39:39+5:302018-03-24T11:07:31+5:30
ही बाईक 300 किलोमीटरच्या वेग गाठू शकते.

सुझकीची 'ही' मोटरसायकल दोन लाखाने झाली स्वस्त
मुंबई: सुझुकी मोटारसायकल्सने आपल्या GSX-R1000R या दुचाकीच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनीने या बाईकची किंमत साधारण 2.20 लाखांनी कमी केली आहे. त्यामुळे अनेक बाईकप्रेमींना आता ही बाईक विकत घेण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता येणे शक्य आहे.
यापूर्वी GSX-R1000R या बाईकची एक्स-शोरूम किंमत 22.50 लाख इतकी होती. दर कमी केल्यानंतर ही किंमत 20.3 लाखांपर्यंत येऊन पोहोचली आहे. लिक्विड कुल, फ्युएल इंजेक्टेड, 999 सीसी आणि इनलाईन फोर सिलिंडर इंजिन ही या बाईकची वैशिष्ट्यं आहेत. ही बाईक 300 किलोमीटरच्या वेग गाठू शकते.