आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 19:35 IST2025-09-08T19:29:08+5:302025-09-08T19:35:01+5:30
याशिवाय, नव्या किमतींसह, कंपनी सणासुदीच्या हंगामाची तयारीही करत आहे. जाणून घेऊयात सविस्तर...

आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
भारत सरकारच्या GST दरांतील कपातीचा परिणाम आता लक्झरी कार सेगमेंटमध्येही दिसू लागला आहे. लेक्सस इंडियाने आपल्या संपूर्ण लाइनअपवरच मोठी किंमत कपात जाहीर केली आहे. ही किंमत 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. याशिवाय, नव्या किमतींसह, कंपनी सणासुदीच्या हंगामाची तयारीही करत आहे. जाणून घेऊयात सविस्तर.
लेक्सस कारच्या किंमतीत किती कपात?
- ES 300h (हायब्रिड सेडान) – 1.47 लाख स्वस्त
-NX 350h (SUV) – 1.6 लाखपर्यंत स्वस्त
-RX रेंज – 2.58 लाखपर्यंत स्वस्त
-LM 350h (MPV) – 5.77 लाखपर्यंत स्वस्त
-LX 500d (फुल-साइज SUV) – 20.8 लाख स्वस्त (ही सर्वात मोठी कपात आहे.)
कंपनी म्हणते... - -
यासंदर्भात बोलताना, लेक्सस इंडियाचे अध्यक्ष हिकारू इकेउची म्हणाले, "या ऐतिहासिक सुधारणेसाठी आम्ही भारत सरकारचे आभार मानतो आणि आमच्या ग्राहकांना पूर्ण फायदा देत असून याचा आम्हाला आनंद आहे. सणासुदीच्या हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे, त्यांना अधिक लक्झरी अनुभवण्याची संधी मिळेल.
...म्हणून खास आहे ही कपात?
लेक्सस इंडिया दीर्घकाळापासून आपल्या किमतींमुळे जर्मन ब्रँडच्या तुलनेत मागे राहत होती. मात्र आता, २० लाख रुपयांपेक्षाही अधिकच्या कपातीने LX 500d सारख्या हाय-एंड SUV ला अधिक आकर्षक बनवले आहे. सणासुदीच्या काळात कारची मागणी वाढत असते, यामुळे किंमतीतील या सुधारणेमुळए या कारच्या विक्रीला नवीन चालना मिळू शकते.