शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

केवळ १० हजारांत बुक करू शकता सर्वात स्वस्त Electric Car; डिझाईनही आहे अनोखं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 16:47 IST

Strom R3 Electric Car: हे स्टार्टअप मुंबईत सुरू करण्यात आलं आहे. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असल्याचं म्हटलं जात आहे.  

देशात पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. अशा परिस्थितीत अनेक जण अन्य पर्यायांच्या शोधात आहे. गेल्या काही महिन्यांपासून देशात इलेक्ट्रीक कार्सनाही मोठी पसंती मिळत आहे. मुंबईतील स्टार्टअप कंपनी Storm Motors नं आपली मिनी इलेक्ट्रीक कार Strom R3 च्या बुकींगला सुरूवात केली आहे. या कारच्या बुकींसाठी केवळ 10 हजार रूपये बुकींग अमाऊंट म्हणून भरावे लागणार आहेत. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असल्याचंही म्हटलं जात आहे. 

Strom R3 ही दोन दरवाजे असलेली आणि तीन चाकी कार आहे. या कारमध्ये पुढील बाजूला दोन आणि मागील बाजूला एक चाक आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुर अशा शहरांकडे लक्ष देत ही कार तयार करण्यात आली आहे. कंपनीनं मस्क्युलर लूकसह यात LED लाईट्स, ड्युअल टोन आणि सनरूफही दिलं आहे. या कारची लांबी 2,907mm, रूंदी 1,405mm आणि उंची 1,572mm असून यात 185mm चा ग्राऊंड क्लिअरन्सही देण्यात आला आहे. या कारचं एकूण वजन 550 किलो असून यामध्ये 13 इंचाचे स्टील व्हिल्स देण्यात आले आहेत. ही कार दिसण्यातही आकर्षक वाटते.

 बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंजStrom R3 मध्ये कंपनीने 13 kW क्षमतेच्या हाय एफिशिअन्सी मोटरचा प्रयोग केला आहे. जो 48Nm चा टॉर्क जनरेट करतो. याव्यतिरिक्त यासोबत एक फास्ट चार्जर देण्यात आला असून याच्या मदतीनं कार केवळ 2 तासांमध्ये 80 टक्के चार्ज होते. या कारला पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागतो. तसंच घरातील 15 अॅम्पिअर क्षमतेच्या घरातील सॉकेटमधूनही ही कार चार्ज करता येऊ शकते.

एका चार्जमध्ये ही कार 200 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. ही कार चालवण्याचा खर्च 40 पैसे प्रति किलोमीटर आहे. ही कार तीन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात येईल. त्यानुसार त्यांची ड्रायव्हिंग रेंजही बदलेल. यामध्ये 120 किमी, 160 किमी आणि 200 किमी अशी ड्रायव्हिंग रेंज आहे. Strom R3 तीन रंगांमध्ये उपलब्ध असून यात इलेक्ट्रिर ब्ल्यू, नियॉन ब्ल्यू आणि रेड-ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.

काय आहेत फीचर्सदिसण्यात जरी ही कार छोटी असली तरी यात अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 12 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, 4.3 इंचाचा इन्स्ट्रूमेंट कन्सोल, क्लायमेट कंट्रोल, रिमोट किलेस एन्ट्री, 7 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, IOT अनेबल्ड कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम, 4G कनेक्टिव्हीटी आणि व्हॉईस कंट्रोल असे अनेक फीचर्स यात देण्यात आले आहेत. 

3 लाखांची बचतकंपनीनं आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या कारची रायडींग कॉस्ट खुप कमी असणार आहे. सामान्य कारच्या तुलनेत Strom R3 400 टक्के अधिक एफिशिअन्सी देते. अन्य कारच्या तुलनेत याचा मेन्टेनन्सदेखील 80 टक्के कमी आहे. 3 वर्षांच्या ड्रायव्हिंगनंतर तुम्ही 3 लाख रूपयांची बचत करू शकाल असंही कंपनीनं म्हटलंय.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन