शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Strom R3: १० हजारांत बुक करा सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार; वर्षाला होईल लाखो रूपयांची बचत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 1:36 PM

Strom R3 Electric Car: मुंबईत सुरू करण्यात आलंय हे स्टार्टअप. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असल्याचं म्हटलं जात आहे. 

ठळक मुद्दे ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असल्याचं म्हटलं जात आहे. वर्षाला लाखो रूपये वाचणार असल्याचा कंपनीचा दावा

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक व्हेईकल सेगमेंटमध्ये एका नव्या प्लेअरची एन्ट्री झाली आहे. मुंबईतील स्टार्टअप कंपनी Storm Motors नं आपली मिनी इलेक्ट्रीक कार Strom R3 च्या प्री-बुकींगला सुरूवात केली आहे. या कारच्या बुकींसाठी केवळ 10 हजार रूपये बुकींग अमाऊंट म्हणून भरावे लागणार आहेत. ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार असल्याचंही म्हटलं जात आहे. Strom R3 ही दोन दरवाजे असलेली आणि तीन चाकी कार आहे. या कारमध्ये पुढील बाजूला दोन आणि मागील बाजूला एक चाक आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुर अशा शहरांकडे लक्ष देत ही कार तयार करण्यात आली आहे. कंपनीनं मस्क्युलर लूकसह यात LED लाईट्स, ड्युअल टोन आणि सनरूफही दिलं आहे. या कारची लांबी 2,907mm, रूंदी 1,405mm आणि उंची 1,572mm असून यात 185mm चा ग्राऊंड क्लिअरन्सही देण्यात आला आहे. या कारचं एकूण वजन 550 किलो असून यामध्ये 13 इंचाचे स्टील व्हिल्स देण्यात आले आहेत. ही कार दिसण्यातही आकर्षक वाटते. 

बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंजStrom R3 मध्ये कंपनीने 13 kW क्षमतेच्या हाय एफिशिअन्सी मोटरचा प्रयोग केला आहे. जो 48Nm चा टॉर्क जनरेट करतो. याव्यतिरिक्त यासोबत एक फास्ट चार्जर देण्यात आला असून याच्या मदतीनं कार केवळ 2 तासांमध्ये 80 टक्के चार्ज होते. या कारला पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 तासांचा कालावधी लागतो. तसंच घरातील 15 अॅम्पिअर क्षमतेच्या घरातील सॉकेटमधूनही ही कार चार्ज करता येऊ शकते.

एका चार्जमध्ये ही कार 200 किलोमीटरपर्यंत जाऊ शकते असा दावा कंपनीनं केला आहे. ही कार चालवण्याचा खर्च 40 पैसे प्रति किलोमीटर आहे. ही कार तीन व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात येईल. त्यानुसार त्यांची ड्रायव्हिंग रेंजही बदलेल. यामध्ये 120 किमी, 160 किमी आणि 200 किमी अशी ड्रायव्हिंग रेंज आहे. Strom R3 तीन रंगांमध्ये उपलब्ध असून यात इलेक्ट्रिर ब्ल्यू, नियॉन ब्ल्यू आणि रेड-ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल. 

फीचर्सदिसण्यात जरी ही कार छोटी असली तरी यात अनेक उत्तम फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये 12 वे अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट, 4.3 इंचाचा इन्स्ट्रूमेंट कन्सोल, क्लायमेट कंट्रोल, रिमोट किलेस एन्ट्री, 7 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टम, IOT अनेबल्ड कंटिन्युअस मॉनिटरिंग सिस्टम, 4G कनेक्टिव्हीटी आणि व्हॉईस कंट्रोल असे अनेक फीचर्स यात देण्यात आले आहेत. 

3 लाखांची बचतकंपनीनं आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार या कारची रायडींग कॉस्ट खुप कमी असणार आहे. सामान्य कारच्या तुलनेत Strom R3 400 टक्के अधिक एफिशिअन्सी देते. अन्य कारच्या तुलनेत याचा मेन्टेनन्सदेखील 80 टक्के कमी आहे. 3 वर्षांच्या ड्रायव्हिंगनंतर तुम्ही ३ लाख रूपयांची बचत करू शकाल असंही कंपनीनं म्हटलंय. या कारच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार या कारची सुरूवातीची किंमत साडेचार लाख रूपये असू शकते.

टॅग्स :AutomobileवाहनcarकारElectric Carइलेक्ट्रिक कार