शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

Cheapest Electric Car India : देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; रेंज 200 किमी, किंमत 5 लाखांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:07 IST

Cheapest Electric Car India : ही Storm R3 ही अतिशय छोटी कार आहे, तिला कंपनीने दोन दरवाजे दिले आहेत.

नवी दिल्ली : भारताच्या ऑटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक कारची मागणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कार निर्मात्यांनी इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रिक कारच्या सध्याच्या रेंजमध्ये टाटा मोटर्स व्यतिरिक्त, एमजी मोटर्स, महिंद्रा, बीएमडब्ल्यू आणि ऑडी या कंपन्यांच्या कारची संख्या सर्वाधिक आहे.

भारतात इलेक्ट्रिक कारला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे, परंतु बरेचदा जास्त किंमतीमुळे लोक या कार खरेदी करू शकत नाहीत. जर तुम्हीही बजेटच्या कमतरतेमुळे इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकत नसाल, तर भारतातील सर्वात कमी किमतीच्या दोन सीटर इलेक्ट्रिक कारची संपूर्ण माहिती जाणून घ्या. येथे आम्ही स्ट्रॉम मोटर्सच्या एका नवीन इलेक्ट्रिक स्टार्ट अप इलेक्ट्रिक कार स्ट्रॉम आर 3 (Storm R3) बद्दल बोलत आहोत, जी तीन चाकी दोन सीटर कार आहे. 

ही Storm R3 ही अतिशय छोटी कार आहे, तिला कंपनीने दोन दरवाजे दिले आहेत. या कारचे एकूण वजन 550 किलो आहे. तसेच, आकाराने 2,907 मिमी लांब, 1,405 मिमी रुंद आणि 1,572 मिमी उंच केले आहे. यासह 185 मिमी ग्राउंड क्लिअरन्स देण्यात आला आहे. Strom R3 चार्जिंगच्या बॅटरी आणि मोटरबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने त्यात 13 kW Lithium Ion बॅटरी पॅक सोबत 15 kW पॉवर मोटर दिली आहे. ही मोटर 20.4 PS पॉवर आणि 90 Nm पीक टॉर्क जनरेट करते. 

या इलेक्ट्रिक कारमध्ये बसवलेल्या बॅटरीच्या चार्जिंगबद्दल कंपनीचा दावा आहे, सामान्य चार्जरने चार्ज केल्यानंतर ती 3 तासांत पूर्ण चार्ज होते. याचबरोबर, Strom R3 च्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 80 kms प्रति तासाच्या टॉप स्पीडसह 200 kms ची ड्रायव्हिंग रेंज देते. या कारमध्ये कंपनीने तीन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत, ज्यात पहिला इको मोड, दुसरा नॉर्मल मोड आणि तिसरा स्पोर्ट्स मोड आहे.

याचबरोबर, कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने कीलेस एंट्री, पॉवर विंडो, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, व्हॉईस कमांड, क्लायमेट कंट्रोल, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन यासारखे फीचर्स दिले आहेत. तसेच, Strom R3 ची सुरुवातीची किंमत 4.50 लाख रुपये आहे आणि ही एक्स-शोरूम किंमत देखील त्याची ऑन-रोड किंमत आहे.

टॅग्स :AutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobile Industryवाहन उद्योग