शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Skoda लवकरच लॉन्च करणार मास मार्केट इलेक्ट्रिक कार, Tata, Mahindra चं टेन्शन वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2023 22:46 IST

स्कोडा ऑटो देखील भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे.

सध्या इलेक्ट्रिक कार जगभरात लोकप्रिय होताना दिसत आहेत. भारतातही इलेक्ट्रिक कारची मागणी वाढू लागली आहे. अनेक भारतीय कंपन्यांनी कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार बाजारात आणल्या आहेत. इलेक्ट्रिक कार एवढ्या स्वस्त झाल्या आहेत की, आता आपण 8 ते 10 लाख रुपयांपर्यंत चांगल्या रेंजची इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकता. यातच आता, स्कोडा ऑटो देखील भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात आपले नशीब आजमावण्याच्या तयारीत आहे.

भारतासाठी आपण लवकरच मास मार्केट इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहोत, अशी घोषणा कंपनीने केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक कारची किंमत 20 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. भारतातील भविष्यातील मोबिलिटी लक्षात घेत, इलेक्ट्रिक कारच्या रणनीतीचा विस्तार करण्याचा स्कोडा ऑटोचा मानस आहे.

एन्याक असू शकते पहिली इलेक्ट्रिक कार - स्कोडा एन्याक (Skoda Enyaq) कंपनीची ग्लोबल इलेक्ट्रिक कार आहे. कंपनी आधिपासूनच अनेक देशांमध्ये या कारची विक्री करत आहे. स्कोडा ऑटोचे सेल्स अँड मार्केटिंग बोर्डाचे सदस्य मार्टिन जॉन यांनी म्हटले आहे की, कंपनी भारतात एंट्री लेव्हल BEV आणण्याचा विचार करत आहे. तसेच कंपनी आपली प्रीमियम एंट्री-लेव्हल Enyaq EV भारतात लॉन्च करन्यावर लवकरच निर्णय घेऊ शकते. याशिवाय, किंमत कमी ठेवण्यासंदर्भात कंपनी स्थानिक निर्मात्यांसोबत भागिदारीत इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यावरही विचार करू शकते.

टाटा-महिंद्राचं टेन्शन वाढणार - भारतातील पॅसेन्जर इलेक्ट्रिक वाहन बाजारावर टाटा आणि महिंद्रा सारख्या कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, स्कोडाने भारतीय बाजारात कमी किंमतीत इलेक्ट्रिक कार लॉन्च केली, तर स्कोडाचा सामना थेट टाटा आणि महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार्स सोबत असेल. याशिवाय स्कोडाचा सामना ह्युंदाई आणि एमजीच्या इलेक्ट्रिक कार्ससोबतही असू शकतो. 

टॅग्स :Skodaस्कोडाTataटाटाMahindraमहिंद्राHyundaiह्युंदाईAutomobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार