अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार; Skoda ची नवीन ऑटोमॅटिक SUV लॉन्च, किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 17:56 IST2024-06-11T17:55:12+5:302024-06-11T17:56:05+5:30
Skoda Kushaq Onyx: Skoda च्या या नवीन SUV ला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाली आहे.

अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार; Skoda ची नवीन ऑटोमॅटिक SUV लॉन्च, किंमत...
Skoda Kushaq Onyx: आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Skoda ने आज भारतीय बाजारपेठेत आपल्या लोकप्रिय Kushaq चे नवीन Onyx व्हर्जन लॉन्च केले आहे. हे नवीन व्हर्जन ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्सने सुसज्ज असेल. कंपनीने या नवीन व्हर्जनची सुरुवातीची किंमत 13.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. या कारमध्ये आधुनिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारला चाईल्ड आणि अडल्ट सेफ्टीमध्ये 5 स्टार रेटिंग्स मिळाले आहे.
पॉवर आणि परफॉर्मन्स : कंपनीने Kushaq Onyx मध्ये 1.0 लिटर क्षमतेचे 3 सिलेंडर टर्बो-पेट्रोल TSI इंजिन वापरले आहे. हे 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रांसमिशन गिअरबॉक्सने सुसज्ज असून, 115Ps पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करते. MQB-AO-IN प्लॅटफॉर्मवर आधारित, ही SUV सुरक्षेच्या दृष्टीनेही अतिशय उत्कृष्ट आहे.
टॉप नॉट्च सेफ्टी: Skoda Kushaq ही देशातील पहिली SUV आहे, जिला अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग मिळाले आहे. या SUV ची क्रॅश टेस्ट 2022 मध्ये झाली होती. यात अडल्ट सेफ्टीत 34 गुणांपैकी 29.64 गुण आणि चाईल्ड सेफ्टीत 49 पैकी 42 गुण मिळाले. ही एसयूव्ही खास भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
कशी आहे Onyx : Kushaq Onyx व्हेरियंट या SUV च्या Active आणि Ambition प्रकारांमध्ये मोडते. उच्च व्हेरियंटचे काही फीचर्सही त्यात समाविष्ट करण्यात आले आहेत. जसे की, यात स्कोडाचा क्रिस्टलाइन एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे, जो स्टॅटिक कॉर्नरिंग फंक्शनसह येतो. मागील बाजूस वायपर आणि डिफॉगर देखील उपलब्ध आहे. याशिवाय 'टेक्टॉन' व्हील कव्हरदेखील दिले आहे.