Self Balancing Scooter: गडकरींचे मोठ्ठे टेन्शन जाणार! धक्का मारा की, ढकला... स्कूटर पडणार नाही; स्वत:च बॅलन्स करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 11:28 AM2023-01-10T11:28:43+5:302023-01-10T11:29:09+5:30

देशात रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यामध्ये बहुतांश अपघाती मृत्यू हे दुचाकी स्वारांचे असतात. केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरींनी वेळेवेळी यावर चिंता व्यक्त केली आहे.

Self Balancing Scooter: Nitin Gadkari's big tension will go! Push or sleep... the liger scooter won't fall; self balancing scooter in Auto Expo 2023 | Self Balancing Scooter: गडकरींचे मोठ्ठे टेन्शन जाणार! धक्का मारा की, ढकला... स्कूटर पडणार नाही; स्वत:च बॅलन्स करणार

Self Balancing Scooter: गडकरींचे मोठ्ठे टेन्शन जाणार! धक्का मारा की, ढकला... स्कूटर पडणार नाही; स्वत:च बॅलन्स करणार

googlenewsNext

यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये एक खतरनाक स्कूटर लोकांच्या दृष्टीस पडणार आहे. धक्का मारा किंवा ढकला ही स्कूटर काही रस्त्यावर पडणार नाही. ती स्वत:च बॅलन्स करेल आणि तुम्हाला पडण्यापासून वाचवेल. तसेच स्वत:च पार्क होईल. अशी अफलातून स्कूटर ऑटो एक्स्पोमध्ये डेब्यू करणार आहे. 

मुंबईच्या लायगर मोबिलिटीने २०१९ मध्ये या सेल्फ बॅलन्सिंग आणि सेल्फ पार्किंग टेक्निकची स्कूटर दाखविली होती. तीच स्कूटर आता उत्पादन घेण्यास सक्षम झाली आहे. कंपनीने या स्कूटरचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. लायगरने ऑटो बॅलन्सिंग टेक्निक स्वत:च विकसित केली आहे. यामुळे चालविणाऱ्याची सुरक्षा, आराम आणि सुविधा वाढणार आहे. टीझरमध्ये स्कूटर मॅट रेड कलरमध्ये दिसत आहे.

देशात रस्ते अपघातात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू होतो. यामध्ये बहुतांश अपघाती मृत्यू हे दुचाकी स्वारांचे असतात. केंद्रीय मंत्री नितीन ग़डकरींनी वेळेवेळी यावर चिंता व्यक्त केली आहे. तसेच विविध उपाययोजना देखील त्यांचे मंत्रालय करत आहे. या तंत्रज्ञानामुळे देशातील निम्मे अपघात कमी होण्याची शक्यता आहे. दुचाकी घसरून बरेच अपघात होत असतात. या स्कूटरमुळे यामध्ये घट होण्याची शक्यता आहे. 

लायगर ही एक ईलेक्ट्रीक स्कूटर आहे. क्लासिक Vespa आणि Yamaha Fascino च्या रुपांवर ही प्रेरित असल्याचे दिसतेय. डेल्टा आकाराचा एलईडी हेडलॅम्प देण्यात आला आहे. एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स देखील दिसत आहेत. गोल आकाराचे एलईडी टर्न इंडिकेटर आहेत. ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी टेल-लाइट, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, रुंद सीट आणि अलॉय व्हील यांसारख्या वैशिष्ट्ये दिसत आहेत. ब्रेकिंगसाठी स्कूटरच्या पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागच्या बाजूला ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

Web Title: Self Balancing Scooter: Nitin Gadkari's big tension will go! Push or sleep... the liger scooter won't fall; self balancing scooter in Auto Expo 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.