शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

व्हीआयपी नंबरचा स्वॅग, स्कूटी खरेदीसाठी खर्च केले 16.15 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 13:26 IST

scooty vip number : मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॅन्सी नंबर प्लेटवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या व्यक्तीचे नाव बृज मोहन आहे.

नवी दिल्ली : चंडीगडमध्ये एका व्यक्तीने स्कूटी घेण्यासाठी तब्बल 16.15 लाख रुपये खर्च केले आहेत. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्च वाटले असेल. आता तुम्ही विचार करत असाल की अशी स्कूटी कोणत्या व्यक्तीने घेतली आहे, ज्याची किंमत इतकी जास्त आहे. दरम्यान, या व्यक्तीने 71,000 रुपयांची होंडा अ‍ॅक्टिव्हा (Honda Activa) स्कूटी खरेदी केली , परंतु या स्कूटीला फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी 15.44 लाख रुपये खर्च केले. अशा प्रकारे ही स्कूटी त्यांनी एकूण 16.15 लाख रुपयांना पडली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॅन्सी नंबर प्लेटवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या व्यक्तीचे नाव बृज मोहन आहे. बृज मोहन हे सेक्टर 23 मध्ये राहतात आणि जाहिरात व्यावसायिक आहेत. CH01-CJ-0001 या नंबरसाठी त्यांनी एवढी मोठी रक्कम खर्च केली आहे. सध्या नुकत्याच खरेदी केलेल्या स्कूटीसाठी ही नंबर प्लेट वापरणार आहे, असे बृज मोहन यांनी सांगितले.  पण अखेरीस ते त्यांच्या कारसाठी वापरणार असल्याचे म्हटले जात आहे.

फॅन्सी नंबरच्या लिलावादरम्यान, CH01-CJ-0001 सर्वात जास्त 15.44 लाख रुपयांना विकला गेला तर या नंबरची रिझर्व्ह किंमत फक्त 50,000 रुपये होती. दुसरीकडे, CH-01-CJ-002 हा नंबर 5.4 लाख रुपयांना विकला गेला. तसेच,  CH-01- CJ-007 नंबरचा लिलाव 4.4 लाख रुपयांना झाला तर CH-01- CJ-003 नंबरचा 4.2 लाख रुपयांना लिलाव झाला.

व्हीआयपी नंबर्सबाबत माहिती..राज्य परिवहन विभागाकडून प्रत्येक सिरीजमध्ये 0001 आणि 9999 दरम्यान अनेक नंबर्संना VIP नंबर्स म्हणून चिन्हांकित केले जातात. हे नंबर्स सामान्य नोंदणी प्रक्रियेद्वारे मिळत नाहीत. परिवहन विभाग सर्व उपलब्ध व्हीआयपी नंबर्सची यादी जाहीर करते.  या नंबर्ससाठी बोली लावून लोक विकत घेऊ शकतात.

टॅग्स :Automobileवाहनbusinessव्यवसायJara hatkeजरा हटके