Sachin Tendulkar Porsche 911 : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर अनेकदा आपल्या फरारी कारमुळे चर्चेत आला आहे. मात्र, आता सचिन आपल्या लक्झरी Porsche सुपरकारमुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच सचिन एका स्टेडियममध्ये लाल रंगाची Porsche 911 चालवताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून, त्या पोर्शे कारबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
Porsche 911 मध्ये काय खास आहे?
सचिन तेंडुलकर जी कार चालवताना दिसला, ती Porsche 911 Carrera आहे. Porsche ब्रँडमधील ही सर्वात लोकप्रिय आणि आयकॉनिक स्पोर्ट्स कार मानली जाते. आकर्षक डिझाइन, जबरदस्त वेग आणि उत्कृष्ट ड्रायव्हिंग एक्सपीरियन्स यासाठी Porsche 911 जगभरात कारप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
Porsche 911 Carrera मध्ये 3.0 लिटर, 6-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, जे सुमारे 290 kW पॉवर, 450 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार केवळ 3.9 सेकंदात 0 ते 100 किमी/तास वेग गाठते. तिचा टॉप स्पीड सुमारे 294 किमी/तास असून, परफॉर्मन्सच्या बाबतीत ही कार अत्यंत दमदार मानली जाते.
Porsche 911 Carrera चे प्रमुख फीचर्स
या लक्झरी स्पोर्ट्स कारमध्ये अनेक आधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत, त्यात मॅट्रिक्स LED हेडलाईट्स आणि LED DRLs, पार्किंग सेंसर्स, 21 इंच अलॉय व्हील्स, 12.65 इंच कर्व्ह्ड डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर,10.9 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट, स्पोर्ट्स सीट्स, डार्क इंटीरियर, एम्बियंट लाइटिंग आणि पुश-बटन स्टार्ट मिळते.
भारतातील Porsche 911 ची किंमत
भारतात Porsche 911 ही कार Coupe आणि Turbo Coupe अशा व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹1.99 कोटींपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंट सुमारे ₹3.80 कोटींपर्यंत जाते. याशिवाय कंपनीकडून कस्टमायझेशनचा पर्यायही दिला जातो, ज्यामुळे ग्राहक आपल्या पसंतीनुसार कारचे डिझाइन आणि फीचर्स निवडू शकतात.
Web Summary : Sachin Tendulkar was seen driving a red Porsche 911 at a stadium. The Porsche 911 Carrera boasts a 3.0-liter engine, reaching 100 km/h in 3.9 seconds. Price ranges from ₹1.99 to ₹3.80 crore in India.
Web Summary : सचिन तेंदुलकर को एक स्टेडियम में लाल रंग की पोर्श 911 चलाते हुए देखा गया। पोर्श 911 Carrera में 3.0-लीटर इंजन है, जो 3.9 सेकंड में 100 किमी/घंटा की रफ्तार पकड़ती है। भारत में कीमत ₹1.99 करोड़ से ₹3.80 करोड़ तक है।