रॉयल एनफील्डच्या सर्वात लोकप्रिय बाईकमध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० चे नाव सर्वात आधी घेतले जाते. या बाईकची गेल्या महिन्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई झाली. सेल्स रिपोर्ट्सनुसार, गेल्या महिन्यात २९ हजार १७२ नवीन ग्राहकांनी रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० खरेदी केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १७.६१ टक्के वाढ दर्शवते.
रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० ची किंमत १.९३ लाख रुपयांपासून सुरू होते. या बाईकच्या टॉप व्हेरिएंटची एक्स शोरूमची किंमत २ लाख ३५ हजार आहे. या बाईकमध्ये ग्राहकांना ३५० सीसी इंजिन मिळते, जे २०.२ बीपीएच पॉवर आणि २७ एनएम टॉर्क जनरेट करतात.
क्लासिक ३५० किती प्रकारांमध्ये उपलब्ध?रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० भारतीय बाजारात एकूण पाच प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकचे सर्वात स्वस्त मॉडेल हेरिटेज व्हर्जन आहे, ज्याची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत २ लाख २८ हजार ५२६ रुपये आहे. देशातील इतर राज्यांमध्ये या किमतीत काही फरक दिसून येतो.
रॉयल एनफील्डचे डाउन पेमेंट कॅल्क्युलेशन काय आहे?रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ११ हजार ५०० रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागेल. या बाईकच्या खरेदीवर बँक ग्राहकांकडून ९ टक्के व्याज आकारते. दोन वर्षांसाठी कर्ज घेतले तर ग्राहकांना दरमहा १०,६७५ रुपये ईएमआय द्यावा लागणार. तीन वर्षांसाठी ९ टक्क्यांनी कर्ज घेतले तर दरमहा ७ हजार ६५० रुपये ईएमआय आकारला जातोय.