रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 11:58 IST2025-08-04T11:57:06+5:302025-08-04T11:58:05+5:30

Rare Earth Metal China: चीनने निर्यात रोखली आहे. भारतातील अनेक दुचाकी, चारचाकी उत्पादक आता दुर्मिळ पृथ्वी चुंबकांना पर्याय शोधत आहेत.

Royal Enfield avoids China's rare earth materials! Used new metal, auto companies were shocked... | रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

सध्या ऑटोमोबाईल बाजारात एकच चर्चा आहे, चीनने रेअर अर्थ मटेरिअलचा पुरवठा थांबविल्याची. या कंपन्या एवढ्या या दुर्मिळ पृथ्वी धातूंवर अवलंबून आहेत की त्यांना याशिवाय नवीन वाहनच तयार करता येणार नाहीय. यामुळे मारुती सारख्या कंपन्यांचे उत्पादन बंद पडण्याच्या वाटेवर आहे. अशावेळी रॉयल एनफिल्डने या सर्व कंपन्यांना चकीत केले आहे. 

भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

ऑटो कंपनी आयशर मोटर्सनुसार रॉयल एनफील्डच्या उत्पादनावर चीनच्या निर्यात बंदीमुळे परिणाम झाला होता. हिमालयन, स्क्रॅम आणि गुरिल्ला सारख्या बाईकची असेंब्ली थांबली होती. रॉयल एनफील्डने यावर नवा पर्याय शोधून काढत त्या मटेरिअलचा वापर सुरु केला आणि उत्पादन केले. 

रेअर अर्थ मेटल चुंबकाची टंचाई होणार हे आधीच कंपनीने हेरले होते. यामुळे त्यांनी तीन-चार महिन्यांपूर्वीच दुर्मिळ पृथ्वी चुंबकांना पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. मोटार आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये दुर्मिळ पृथ्वी चुंबक अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यांचे ९० टक्के उत्पादन चीनमध्ये होते. चीनने याच्या निर्यातीवर बंदीचा निर्णय घेतला होता. यामुळे जगभरातील ऑटो सेक्टरला जोरदार फटका बसला आहे. 

भारतातील अनेक दुचाकी उत्पादक आता दुर्मिळ पृथ्वी चुंबकांना पर्याय शोधत आहेत. टीव्हीएसने देखील याला पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. ओला इलेक्ट्रिकने आधीच दुर्मिळ पृथ्वी चुंबकमुक्त तंत्रज्ञानाचा वापर करणारी मोटर डिझाइन केली आहे. आणि डिसेंबर तिमाहीपासून ही मोटर वाहनांमध्ये वापरण्यास सुरुवात करणार आहे. 
 

Web Title: Royal Enfield avoids China's rare earth materials! Used new metal, auto companies were shocked...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.