बाईकप्रेमींसाठी गुड न्यूज; लवकरच लॉन्च होणार Royal Enfield च्या 3 दमदार बाईक, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:49 IST2024-12-16T19:48:33+5:302024-12-16T19:49:11+5:30
Royal Enfield 3 New Bikes: तुम्ही रॉयल एनफिल्ड बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी वाट पाहा.

बाईकप्रेमींसाठी गुड न्यूज; लवकरच लॉन्च होणार Royal Enfield च्या 3 दमदार बाईक, पाहा...
Upcoming Royal Enfield Bikes: भारतातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Royal Enfield ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन बाईक्स लॉन्च करत आहे. कंपनीच्या दमदार गाड्यांची भारतीयांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये रॉयल एनफिल्ड क्लासिकपासून ते बुलेटपर्यंत...अनेक बाईक्स आहेत. दरम्यान, तुम्ही नवीन रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच कंपनी आपल्या 3 नवीन बाईक्स भारतीय बाजारपेठेत लॉन्य करणार आहे.
Royal Enfield Classic 650
कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकमध्ये क्लासिक 350 चे नाव टॉपवर आहे. आता कंपनी याच बाईकचे पुढील व्हर्जन, Royal Enfield Classic 650
लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या आगामी Royal Enfield Classic 650 मध्ये दमदार 648cc ट्विन इंजिन असेल. हे 47.4 bhp ची कमाल पॉवर आणि 52.4nm चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Royal Enfield 2025 च्या पहिल्या तिमाहीत Classic 650 लॉन्च करू शकते.
Royal Enfield Bullet 650
रॉयल एनफिल्डकडून लवकरच Bullet 650 देखील लॉन्च केली जाऊ शकते. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या बुलेट 350 मध्ये तुम्हाला अनेक उत्तम फीचर्स मिळतात. आता या नवीन बाईकमध्येही अॅडव्हान्स फीचर्स मिळतील. Royal Enfield Bullet 650 भारतीय रस्त्यांवर अनेकदा चाचणीदरम्यान दिसली आहे. या बाईकमध्येही 648cc ट्विन-सिलेंडर इंजिन मिळणार आहे.
Royal Enfield Himalayan 650
तुम्ही नवीन रॉयल एनफील्ड बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर हिमालयन 650 तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. ही बाईक पुढील वर्षी सणासुदीच्या काळात लॉन्च होणार आहे. हिमालयन 650 इंटरसेप्टरच्या ट्रेलीस फ्रेमवर आधारित असणार आहे. तुम्ही आगामी काळात या तीनपैकी कोणतीही एक बाइक खरेदी करण्याचा विचार करू शकता.