जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 17:47 IST2025-11-05T17:46:27+5:302025-11-05T17:47:36+5:30
प्रसिद्ध कार कंपनीने अशी एक कार बनवली आहे, ज्याचे जगात फक्त तीन युनिट्स तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक कारची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
जगभरात आलिशान आणि महागड्या गाड्यांची क्रेझ नेहमीच दिसून येते. या सेगमेंटमध्ये एक कंपनी अशी आहे, जी जगातील सर्वात महागड्या आणि खास गाड्या बनवण्यासाठी ओळखली जाते. ही कंपनी रोल्स-रॉयस आहे. रोल्स-रॉयसने अशी एक कार बनवली आहे, ज्याचे जगात फक्त तीन युनिट्स तयार करण्यात आले आहेत. या प्रत्येक कारची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल. चला, जाणून घेऊया या खास गाडीचं नाव, तिची किंमत आणि जगातील ते तीन मालक कोण आहेत...
जगातील सर्वात महागडी कार कोणती?
जगात अवघ्या ३ गाड्या असणारी ही कार रोल्स-रॉयस बोट टेल आहे. या कारची किंमत आहे २८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, जी भारतीय रुपयांमध्ये सुमारे २३२ कोटी इतकी होते. विशेष म्हणजे, रोल्स-रॉयसने या कारचे केवळ तीन युनिट्स बनवले आहेत. या तिन्ही युनिट्सची रचना ग्राहकांच्या मागणीनुसार खास पद्धतीने करण्यात आली आहे.
नाव आणि डिझाइनमध्ये आहे खास?
रोल्स-रॉयसच्या या कारला खास बोटीसारखा आकार देण्यात आला आहे, म्हणूनच तिचे नाव 'बोट टेल' असे ठेवण्यात आले. ही कार ४-सीटर असून, तिच्या डिझाइनमध्ये १९१०च्या रोल्स-रॉयस गाडीची झलक पाहायला मिळते.
खास फिचर्स काय?
या अतिशय स्टायलिश गाडीत दोन रेफ्रिजरेटर बसवण्यात आले आहेत. त्यापैकी एक रेफ्रिजरेटर खास शॅम्पेन ठेवण्यासाठी डिझाइन केला गेला आहे. या कारची प्रेरणा क्लासिक 'यॉट'च्या डिझाइनमधून घेण्यात आली आहे, ज्यात सागरी निळ्या रंगाचा खास फिनिश देण्यात आला आहे.
२३२ कोटींच्या कारचे तीन खास मालक कोण?
रोल्स-रॉयस बोट टेलच्या केवळ तीन युनिट्सचे मालक असलेले हे तिघेही जगभरातील मोठे आणि प्रसिद्ध व्यक्ती आहेत.
या तीन कारपैकी एका युनिटचे मालक अब्जाधीश रॅपर जे-झेड आणि त्यांची पत्नी, प्रसिद्ध गायिका बेयॉन्से हे आहेत. दुसऱ्या मॉडेलच्या मालकाचे नाव गुप्त असले तरी, ते कथितरित्या मोत्यांच्या उद्योगाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. जगातील या सर्वात महागड्या कारचे तिसरे मालक अर्जेंटिनाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू माउरो इकार्डी हे आहेत. या कारमुळे रोल्स-रॉयसने आलिशान कार जगतात पुन्हा एकदा आपली मक्तेदारी सिद्ध केली आहे.