Renault Car Offers: या तीन स्वस्त गाड्या आता मिळतील आणखी स्वस्त, थेट 50 हजारांचा फरक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 14:52 IST2022-10-08T14:51:41+5:302022-10-08T14:52:08+5:30
Renault October Discount : ही ऑफर केवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंतच लागू आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये रोख सूट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे.

Renault Car Offers: या तीन स्वस्त गाड्या आता मिळतील आणखी स्वस्त, थेट 50 हजारांचा फरक!
जर आपण दिवाळीच्या मूहुर्तावर नवी गाडी घेण्याचा विचार करत असाल, मात्र बजेटमध्ये थोडी-फार समस्या असेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण, कार निर्माता कंपनी रेनो (Renault) आपल्या Kwid, Triber आणि Kiger या तीन स्वस्त गाड्यांवर मोठी सूट ऑफर करत आहे. या ऑफर अंतर्गत आपण कंपनीची कार 50 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. मात्र, ही ऑफर केवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंतच लागू आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये रोख सूट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे.
Renault Kwid डिस्काउंट -
ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. या कारवर ऑक्टोबर महिन्यात एकूण 35,000 रुपयांची सूट मिळत आहे. यात 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 10,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. रेनो क्विडची किंमत 4.64 लाख रुपयांपासून ते 5.99 लाख रुपयांपर्यंत जाते.
Renault Triber डिस्काउंट -
Renault Triber ही भारतातील एकमेव सब-4 मिटर MPV आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनी या गाडीवर एकूण 50,000 रुपयांची सूट देत आहे. यात 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 10,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. रेनो ट्राइबरची किंमत 5.92 लाख रुपयांपासून ते 8.51 लाख रुपयांपर्यंत जाते.
Renault Kiger डिस्काउंट -
ही कंपनीची सब-4 मिटर SUV आहे. रेनो किगरवर केवळ कॉरपोरेट डिस्काउंटच्या स्वरुपात 10,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. रेनो किगरची किंमत 5.99 लाख रुपयांपासून ते 10.62 लाख रुपयांपर्यंत जाते. हिचा सामना किआ सॉनेट, निसान मॅग्नाइट आणि मारुती ब्रेझा सारख्या कार सोबत आहे.