शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

कारच्या काचेवरील पाणी असे घालवा...चटकन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 19:35 IST

पावसाळ्यात कार चालविणे थोडे त्रासदायक असते. पावसाचे पाणी सारखे काचेवर पडत असल्याने पुढचे किंवा बाजुचे पाहणे कठीण होते.

मुंबई: पावसाळ्यात कार चालविणे थोडे त्रासदायक असते. पावसाचे पाणी सारखे काचेवर पडत असल्याने पुढचे किंवा बाजुचे पाहणे कठीण होते. जर वायपर काम करत नसेल तर आणखीनच कठीण. काही वस्तूंचा वापर केल्यास या समस्येपासून सुटका करून घेता येते.

 रेन रिपेलंटच्या वापराने काचेवरील पाणी चटकन ओघळते. पाऊस सुरु होण्यापूर्वी किंवा कारमधून प्रवासास निघताना काच पाण्याने धुवून घ्यावी. कपड्याने पुसुन घेतल्यानंतर रेन रिपेलंट लावावे. यामुळे पावसात वायपर्स लावण्याची गरजही भासणार नाही. या रिपेलंटचा वापर मागील काचेसाठी केल्यास उत्तम. कारण काही मॉडेलमध्ये मागील काचेवर वायपर नसतो. यामुळे पावसाचे पाणी पडल्यास मागचे काहीच दिसत नाही. रात्रीच्यावेळी तर पिवळी लाईट पसरते. 

याचबरोबर खिडक्यांच्या काचांनाही रिपेलंट लावावे. यामुळे साईड मिररमधून मागचे पाहणे सोपे ठरते. तसेच काचांमधून आजुबाजुने गाडी जात, येत असल्यास त्याचाही अंदाज येतो. 

रिपेलंट कसे काम करते?काचेवर रिपेलंट लावल्यास पडलेल्या पाण्याचे छोटे छोटे थेंब बनतात. म्हणजेच काचेवर तुळतुळीतपणा येतो. यामुळे पाण्याच्या थेंबांना अडकण्यासाठी घर्षण जागाच न मिळाल्याने ते काचेवर टिकत नाहीत व खाली ओघळतात.

रिपेलंटची किंमत रेन रिपेलंट ऑनलाईन किंवा बाजारात आरामात मिळते. हे 350 रुपयांपासून मिळते. यासाठी चांगल्या कंपन्यांचे उत्पादन घेतलेले चांगले.

टॅग्स :carकारRainपाऊसWaterपाणीAutomobileवाहनonlineऑनलाइनMarketबाजार