शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:43 IST

GST 2.0: कोणत्या मॉडेलवर किती रुपयांची बचत होणार, जाणून घ्या..!

GST 2.0: BMW इंडियाने आपल्या अनेक कार आणि बाईक्सच्या किमतींमध्ये मोठी कपात जाहीर केली आहे. नवीन GST स्लॅब लागू झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, याची अंमलबजावणी २२ सप्टेंबर २०२५ पासून होणार आहे. कंपनीने सांगितले की, या निर्णयाचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे. सणांचा हंगाम खास बनवण्यासाठी विशेष ऑफर्सही दिल्या जात आहेत. महत्वाचे म्हणजे, किमतींमध्ये कमाल १३.६ लाख रुपयांपर्यंतची कपात करण्यात आली आहे.

बाईक्सच्या किमतीही कमी झाल्याहा बदल बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया, मिनी इंडिया आणि बीएमडब्ल्यू मोटोराडच्या अंतर्गत येणाऱ्या मॉडेल्सवर लागू होणार आहे. कार सेगमेंटमध्ये अनेक बीएमडब्ल्यू मॉडेल्स व मिनी कूपर एस यांचा समावेश आहे, तर दुचाकी सेगमेंटमध्ये G 310 RR व C 400 GT बाईक्सच्या किमतींमध्ये कपात झाली आहे.

प्रमुख मॉडेल्सवरील नवी किंमत (२२ सप्टेंबर २०२५ पासून लागू)

मॉडेलव्हेरिएंटजुनी किंमतनवी किंमतकिंमत फरक
BMW 2 Series Gran Coupe218i M Sport₹46,90,000₹45,30,000₹1,60,000
BMW 3 Series LWB320Ld M Sport₹65,30,000₹61,75,000₹3,55,000
BMW 5 Series LWB530Li M Sport₹76,50,000₹72,35,000₹4,15,000
BMW 7 Series LWB740i M Sport₹1,89,70,000₹1,79,45,000₹10,25,000
BMW X1sDrive18d M Sport₹55,90,000₹52,15,000₹3,75,000
BMW X3xDrive20d M Sport₹78,30,000₹73,10,000₹5,20,000
BMW X5xDrive40i₹1,00,30,000₹93,60,000₹6,70,000
BMW X7xDrive40d M Sport₹1,38,40,000₹1,29,15,000₹9,25,000
BMW Z4M40i₹92,90,000₹87,90,000₹5,00,000
BMW M2M2₹1,06,00,000₹1,00,25,000₹5,75,000
BMW M4Competition₹1,61,00,000₹1,52,30,000₹8,70,000
BMW M8M8₹2,52,00,000₹2,38,40,000₹13,60,000
BMW XMXM₹2,60,00,000₹2,54,55,000₹5,45,000

(इतर अनेक मॉडेल्सच्या किमतीही कमी झाल्या आहेत.)

कंपनीने काय म्हटले?कंपनीच्या मते, सणांच्या हंगामात बीएमडब्ल्यू कार खरेदी करणे हे एक अविस्मरणीय अनुभव असतो. यंदा ग्राहकांना डबल फायदा मिळणार आहे. एकीकडे BMW Smart Finance मार्फत एक्सक्लूसिव्ह फायनान्शियल ऑफर्स, तर दुसरीकडे GST 2.0 मुळे एक्स-शोरूम किंमतींमध्ये १३.६ लाख रुपयांपर्यंतची घट झाली आहे. नवीन खरेदीदारांना या कपातीचा व ऑफर्सचा मोठा लाभ मिळणार आहे. 

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूGSTजीएसटीcarकारbikeबाईकAutomobileवाहन