शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

या कंपनीच्या पेट्रोल-डिझेल कार बंद होणार; पुढील वर्षापासून फक्त EV गाड्या विकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 20:07 IST

Volkswagen: इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता अनेक कंपन्या EV कडे शिफ्ट होत आहेत.

Volkswagen Plan For Norway: वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आणि भविष्यातील इंधनाचा तुटवडा लक्षात घेऊन अनेक ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या बनवण्यावर भर देत आहेत. यातच आता फॉक्सवॅगनने या वर्षाच्या अखेरीस नॉर्वेमध्ये इंटरनल कंब्शन इंजिन(ICE) वाहनांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पुढील वर्षापासून नॉर्वेमध्ये पेट्रोल किंवा डिझेल कारची विक्री होणार नाही.

यापुढे नॉर्वेमध्ये फॉक्सवॅगनच्या इलेक्ट्रिक गाड्या (EVs) विकल्या जातील. नॉर्वेमधील फोक्सवॅगनची आयातदार - मोलर मोबिलिटी ग्रुपने याबाबतची माहिती दिली आहे. फॉक्सवॅगन या वर्षी डिसेंबरमध्ये नॉर्वेमध्ये आपल्या शेवटच्या ICE कारची विक्री करेल. डिसेंबर 2023 पर्यंत सर्व ICE कार ऑर्डर पूर्ण करण्याची कंपनीची योजना आहे. त्यानंतर, कंपनी फक्त त्यांचे इलेक्ट्रिक मॉडेल्स विकेल.

इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नॉर्वे आघाडीवर लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत नॉर्वे जगात आघाडीवर आहे. देशातील 20% पेक्षा जास्त वाहने ईव्ही आहेत आणि नवीन वाहनांच्या विक्रीत सुमारे 84% हिस्सा ईव्हीचा आहे. नॉर्वेजियन रोड फेडरेशनच्या मते प्लग-इन हायब्रिड जोडल्यावर हा आकडा 90% पर्यंत पोहोचेल.

नॉर्वे सरकारची योजनारिपोर्ट्सनुसार, नॉर्वे सरकार 2025 पर्यंत सर्व ICE वाहनांवर बंदी घालण्याची योजना आखत आहे. असे करणारा हा जगातील पहिला देश असेल. मात्र, फॉक्सवॅगनने वर्षभरापूर्वीच देशात आयसीई वाहनांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. इतर कंपन्या असा निर्णय घेणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.

टॅग्स :carकारElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन