शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 11:40 IST

Electric Scooter Sales December 2025 : वाहन डेटानुसार गेल्या महिन्यात एकूण ९३,००० इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी झाली. यात प्रमुख कंपन्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे.

भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर (E2W) बाजारपेठेत २०२५ या वर्षाचा शेवट अत्यंत रंजक वळणावर झाला आहे. डिसेंबर २०२५ च्या ताज्या आकडेवारीनुसार, TVS Motor ने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, एकेकाळी बाजारावर राज्य करणाऱ्या ओला इलेक्ट्रिकला मोठा धक्का बसला असून कंपनी आता पाचव्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

वाहन डेटानुसार गेल्या महिन्यात एकूण ९३,००० इलेक्ट्रिक दुचाकींची नोंदणी झाली. यात प्रमुख कंपन्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

१. TVS Motor: २५,०३९ युनिट्सच्या विक्रीसह टीव्हीएस पहिल्या स्थानावर कायम आहे. मात्र, नोव्हेंबरच्या तुलनेत त्यांच्या विक्रीत १७.४% ची घट झाली आहे.२. Bajaj Chetak: बजाजच्या विक्रीत सर्वात मोठी घसरण (२६.४%) पाहायला मिळाली. १८,७९० युनिट्ससह ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ३. Ather Energy: एथरने १७,०५२ युनिट्सची विक्री केली असून त्यांच्या विक्रीत १६.१% ची घट झाली आहे. ४. Hero Vida: हिरोच्या 'विडा' ब्रँडने १०,७०१ युनिट्सची विक्री करत आपले चौथे स्थान टिकवून ठेवले आहे. ५. Ola Electric: या यादीत केवळ ओला इलेक्ट्रिकने ७.४% ची सकारात्मक वाढ नोंदवली आहे. ८,४०० वरून ९,०२० युनिट्सपर्यंत त्यांनी मजल मारली असून त्यांचा मार्केट शेअर ९.३% वर पोहोचला आहे.

उर्वरित कंपन्यांमध्ये ग्रीव्हज इलेक्ट्रिक आणि बीगॉस यांनी आपली उपस्थिती टिकवून ठेवली असली तरी, एकूण ९३,००० युनिट्सच्या या बाजारपेठेत प्रस्थापित ऑटो कंपन्यांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे.

ओलाच्या न वाढीचे कारण काय?

तज्ज्ञांच्या मते, ओलाची सर्व्हिस अत्यंत खराब असल्याने त्याचा फटका कंपनीला बसला होता. आता राबवलेला 'हायपरसर्व्हिस' कार्यक्रम, ज्यामध्ये ७७% तक्रारींचे निवारण त्याच दिवशी केले जात आहे, त्याचा सकारात्मक परिणाम विक्रीवर होताना दिसत आहे. तरीही ओलाच्या स्कूटरची किंमत थोडी जास्तच असल्याने तसेच ओलाच्या मोटरसायकलला फार कमी प्रतिसाद मिळत असल्याचा फटका कंपनीला बसत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bajaj-Ather Challenged TVS in December; Ola's Sales Rise Slightly

Web Summary : TVS led December electric two-wheeler sales, followed by Bajaj and Ather. Ola Electric's sales increased slightly, driven by improved service, but it still ranked fifth due to high prices and low motorcycle demand.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर