आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:36 IST2025-09-20T18:34:46+5:302025-09-20T18:36:19+5:30
Ola Roadster News: ओलाची स्कूटर आणि त्याची समस्या यामुळे आधीच ग्राहक वैतागले होते. त्यात कुणाल कामरासारख्यांनी आवाज उठविल्याने केंद्र सरकारच्या मंत्रालयापर्यंत ग्राहकांचे आवाज पोहोचले होते.

आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
ओलाची सर्व्हिस, ओलाच्या ईलेक्ट्रीक स्कूटरच्या समस्या या कमी नाहीत म्हणून की काय आता नव्या कोऱ्या ईलेक्ट्रीक बाईक आपटून, धोपटून त्यांची डिलिव्हरी ग्राहकांना दिली जात आहे. मुंबईत हा प्रकार घडला आहे. ग्राहकाने नवरात्रीच्या मुहूर्तावर बाईकची डिलिव्हरी मिळावी म्हणून मुंबईतील ग्राहकाने ओलाची ईलेक्ट्रीक मोटरसायकल रोडस्टर एक्स बुक केली होती. या रोडस्टरच्या पीडीआयवेळी तो ग्राहक त्या मोटरसायकलची अवस्था पाहून पार हादरला आहे.
ओलाची स्कूटर आणि त्याची समस्या यामुळे आधीच ग्राहक वैतागले होते. त्यात कुणाल कामरासारख्यांनी आवाज उठविल्याने केंद्र सरकारच्या मंत्रालयापर्यंत ग्राहकांचे आवाज पोहोचले होते. यामुळे ओलाला नोटीसही आल्या होत्या. यानंतर ओलाने हालचाली करत थोडीफार सर्व्हिसमध्ये सुधारणा केली होती. परंतू, नवीन मोटरसायकल आपटून, धोपटून देण्याचा प्रकार सुरुच असल्याचे यातून दिसत आहे.
ओलाच्या मालाड, मुंबईतील शोरुममधून या रोडस्टर मोटरसायकलची डिलिव्हरी २२ सप्टेंबरला होणार होती. त्यापूर्वी ग्राहकाला शोरुमकडून मोटरसायकल आली असल्याचा फोन आला होता. म्हणून हा ग्राहक मोटरसायकल पाहण्यासाठी पोहोचला होता. तेव्हा त्याला पॅनेलवर स्क्रॅचेस, खोलवर आदळल्याच्या खुना आणि डेंट दिसून आले. पीडीआय केल्याने हा प्रकार समोर आला आहे. रोडस्टर नवीन मॉडेल आहे, यामुळे त्याचे स्पेअर पार्टही उपलब्ध नाहीत. सोमवारी डिलिव्हरी घ्यायची आहे, परंतू ते कधी मिळतील याची शोरुमवाल्यांनाच शाश्वती नाही. ओलाची सर्व्हिस एवढे दणके मिळाले तरी सुधरलेली नसल्याचे यावरून दिसत आहे.
या ग्राहकाने ओला ईलेक्ट्रीक, ओलाचा मालक भाविष अग्रवाल यांना टॅग करून याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. या मोटरसायकलच्या पॅनेलमध्येही मोठे मोठे गॅप असल्याची तक्रार ग्राहकाने केली आहे.