ओला इलेक्ट्रिकचा धमाका! ५०१ किमी रेंजची Roadster X+ च्या किमतीत ६०,००० रुपयांची कपात; आता नवीन किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:53 IST2026-04-02T14:52:36+5:302026-04-02T14:53:08+5:30

Ola Electric News: स्वदेशी ४६८० भारत सेलचे उत्पादन वाढल्यामुळे ओलाने Roadster X+ च्या किमतीत ६०,००० रुपयांची मोठी कपात केली आहे.

Ola Electric's explosion! Price of 501 km range Roadster X+ reduced by Rs 60,000; Now the new price is only... | ओला इलेक्ट्रिकचा धमाका! ५०१ किमी रेंजची Roadster X+ च्या किमतीत ६०,००० रुपयांची कपात; आता नवीन किंमत फक्त...

ओला इलेक्ट्रिकचा धमाका! ५०१ किमी रेंजची Roadster X+ च्या किमतीत ६०,००० रुपयांची कपात; आता नवीन किंमत फक्त...

गेल्या काही महिन्यांपासून विक्रीच्या आकड्यांत झपाटून मार खाल्लेल्या ओला इलेक्ट्रीकने आधी सेवा सुधरविण्यास सुरुवात केली होती. नुकत्याच संपलेल्या मार्चमध्ये ओलाने नाही म्हणायला १० हजारांचा आकडा गाठला आहे. अशातच कंपनीचे मालक भाविश अग्रवाल यांनी नवीन घोषणा केली आहे. 

भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी ओला इलेक्ट्रिकने 'प्राइस वॉर' सुरू केले आहे. कंपनीने आपल्या लोकप्रिय Roadster X+ (9.1 kWh) या व्हेरिएंटच्या किमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी १,८९,९९९ रुपये असलेली या बाईकची किंमत आता थेट १,२९,९९९ रुपयांवर आली आहे. Roadster X+ 9.1 kWh हे मॉडेल ओलाच्या लाइनअपमधील सर्वात पॉवरफुल बॅटरी बॅकअप असलेल्या बाईक्सपैकी एक आहे. एका चार्जमध्ये ही बाईक ५०१ किमीपर्यंत अंतर कापू शकते. 

यात क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स मोड आणि मोठी टचस्क्रीन डिस्प्ले सारखे प्रगत फीचर्स देण्यात आले आहेत. ही बाईक अवघ्या २.७ सेकंदात ० ते ४० किमी प्रति तास वेग पकडू शकते.

किंमत कपातीचे 'स्वदेशी' गणित
अग्रवाल यांच्या दाव्यानुसार ओला इलेक्ट्रिकने आता स्वतःच्या 'गीगाफॅक्टरी'मध्ये ४६८० भारत सेलचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. यापूर्वी हे सेल आयात करावे लागत होते किंवा उत्पादनाचा खर्च जास्त होता. मात्र, आता देशातच मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने बॅटरी पॅकचा खर्च कमी झाला आहे. याचा थेट फायदा कंपनीने ग्राहकांना दिला असून, या मॉडेलची किंमत १,८९,९९९ रुपयांवरून थेट १,२९,९९९ रुपयांवर (एक्स-शोरूम) आणली आहे.

काय आहे '४६८० भारत सेल'?
हा एक सिलिंडरच्या आकाराचा मोठा बॅटरी सेल आहे, जो टेस्लाच्या तंत्रज्ञानाशी मिळताजुळता आहे. ओला हा सेल भारतात बनवणारी पहिली कंपनी ठरली आहे. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढते आणि चार्जिंगचा वेगही सुधारतो.

ग्राहकांसाठी मोठी संधी
सुरुवातीला मोठ्या आघाडीवर असलेल्या ओला इलेक्ट्रीकला सर्व्हिस न दिल्याने मोठा फटका बसला होता. दुरुस्त न झाल्याने अनेकांच्या गाड्या आज भंगारात गेलेल्या आहेत. लोकांनी पेट्रोलवरील पैसे वाचविण्यासाठी ओलाच्या स्कूटर खरेदी केल्या होत्या. परंतू, कंपनी सर्व्हिस देत नव्हती. यामुळे अनेकांनी आपल्या गाड्या पेटविल्याच्या देखील घटना घडल्या होत्या. नाचक्की होत असताना कंपनी काही केल्या सुधरायला तयार नव्हती. हे युद्ध स्टँडअप कॉमेडिअनने सोशल मीडियावर नेले आणि त्यानंतर केंद्राच्या मंत्रालयाला देखील याची दखल घ्यावी लागली होती. यातच ओलाचे गोवा, महाराष्ट्रात विक्री केंद्रे बंद करण्यात आली. याचा फटका कंपनीच्या विक्रीवर बसला आणि ही विक्री कधी चार हजारांवर आली कंपनीलाही समजले नाही. ओलाच्या स्कूटरच्या किंमतीदेखील दीड-दोन लाखांवर देल्या होत्या. याचाही फटका कंपनीला बसला होता. यामुळे कंपनीने आता पुन्हा डिस्काऊंट देण्याच्या घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title : ओला इलेक्ट्रिक ने Roadster X+ की कीमत ₹60,000 घटाई!

Web Summary : ओला इलेक्ट्रिक ने स्थानीय बैटरी उत्पादन से बढ़ावा पाकर Roadster X+ की कीमत ₹1,29,999 कर दी। 501 किमी रेंज वाले स्कूटर में उन्नत तकनीक है। इस कदम का उद्देश्य सेवा मुद्दों के बाद बाजार हिस्सेदारी हासिल करना है।

Web Title : Ola Electric Slashes Roadster X+ Price by ₹60,000!

Web Summary : Ola Electric dramatically cuts Roadster X+ price to ₹1,29,999, boosted by local battery production. The 501km range scooter features advanced tech. This move aims to regain market share after service issues impacted sales.

टॅग्स :Olaओला