शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

Ola Electric Scooter: लॉन्चिंगआधी टीजर आला समोर; Ola Electric Scooter मध्ये मिळणार अनेक शानदार फिचर्स, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 16:36 IST

Ola Electric Scooter will launch soon: ओलाच्या फ्युचर फॅक्टरीचा पहिला टप्पा केवळ चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. भाविश यांनी ओलाच्या या स्कूटरमध्ये कोणती फिचर्स मिळतील याची हिंटही दिली आहे.

Ola Electric Scooter (ओला इलेक्ट्रिक स्कूटर) लवकरच भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार आहे. ओला इंडियाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी सोशल मीडियाद्वारे या स्कूटरची एक झलक दाखविली आहे. यात त्यांनी ही स्कूटर रस्त्यावर कसे कामगिरी करेल याची माहिती दिली आहे. या ई-स्कूटरचे उत्पादन लवकरच सुरु होणार असल्याचे ते म्हणाले आहेत. (Ola Electric Scooter teaser out before launch in India.)

Electric Scooter: बिना चार्जिंगच्या धावतात या इलेक्ट्रीक स्कूटर; लांबच्या प्रवासात फक्त 5 मिनिटेच थांबावे लागते

ओलाच्या फ्युचर फॅक्टरीचा पहिला टप्पा केवळ चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. भाविश यांनी ओलाच्या या स्कूटरमध्ये कोणती फिचर्स मिळतील याची हिंटही दिली आहे. या ओला स्कूटरमध्ये बेस्ट ईन क्लास बूट स्पेस (दोन हेल्मेट ठेवण्याएवढी जागा),  बेस्ट-इन-क्लास राइडिंग रेंज सारखी फिचर असणार आहेत. अॅप बेस्ड कीलेस अॅक्सेस देखील मिळणार आहे. तसेच नेव्हिगेशन आणि ब्ल्यूटूथ कनेक्टिव्हिटी सारखे फिचर्स मिळणार आहेत. 

या स्कूटरचा वेग एवढा आहे की, भाविश यांनी एका ट्विटचा हवाला देत ते वाचून होईस्तोवर ती स्कूटर 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग पकडते. या महिन्याच्या अखेरीस या स्कूटरची किंमत जाहीर (Ola Electric Scooter price) केली जाण्याची शक्यताआहे. ही स्कूटर Ather 450X सारख्या ईलेक्ट्रीक स्कूटरला कडवी टक्कर देणार आहे.

सध्या बाजारात असलेल्या ईव्ही स्कूटरची रेंज ही 70 ते 100 च्या आसपास आहे. तर त्या चार्ज करण्यासाठीदेखील तासंतास लागतात. परंतू ओलाची स्कूटर अवघ्या 5 मिनिटांत फूल चार्ज होणार आहे. म्हणजेच पेट्रोल भरण्यासाठी रांगेत राहून ते पेट्रोल पंपावरून पैसे देऊन बाहेर पडण्याचा जो वेळ आहे त्यापेक्षा कमी वेळात ही स्कूटर चार्ज होणार आहे. तसेच या स्कूटरची रेंजही जास्त असणार आहे. या पहिल्या स्कूटरची झलक ओलाने दिली आहे. 

ही स्कूटर एका चार्जमध्ये 240 किलोमीटर जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एक्ट्रा बॅटरी बाळगली तर याची रेंज दुप्पट होणार आहे. या प्रक्रियेलाही केवळ ५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. स्वॅपेबल बॅटरी म्हणजे डिस्चार्ज बॅटरीच्या जागी दुसरी बॅटरी लावता येते. इतर फिचर आता हळूहळू समोर येणार आहेत. परंतू ही सुविधा मोठमोठ्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

दर दोन सेकंदाला...एक! Ola ची Electric scooter येतेय; फक्त 5 मिनिटांत फूल चार्ज होणार

500 एकरावर प्रकल्पओला या स्कूटर बनविण्यासाठी बंगळूरूमध्ये 500 एकरावर भलामोठा प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीच्या टॉपच्या पदाधिकाऱ्यांनी आंब्याची बाग असलेली जागा पाहिली आहे. या जागेत पुढील 12 महिन्यांत हा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकरल्पात वर्षाला दोन दशलक्ष स्कूटर तयार केल्या जाणार आहेत. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड