Ola Electric Sale Starts Today: आजपासून खरेदी करता येणार ओला स्कूटर; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 10:10 AM2021-09-08T10:10:03+5:302021-09-08T10:12:37+5:30

Ola Electric Sale Starts Today: जर तुम्ही ओला ईलेक्ट्रीक स्कूटर बुक केली असेल आणि खरेदी करण्यास इच्छुक असाल तर काही गोष्टींकडे तुम्हाल लक्ष द्यावे लागणार आहे. 

Ola Electric scooter Sale Starts Today: Ola scooters can be purchased from today; Find out ... | Ola Electric Sale Starts Today: आजपासून खरेदी करता येणार ओला स्कूटर; जाणून घ्या...

Ola Electric Sale Starts Today: आजपासून खरेदी करता येणार ओला स्कूटर; जाणून घ्या...

Next

ओला इलेक्ट्रिक स्कूटर (Ola Electric Scooters) भारतात धुमाकूळ करणार आहे. ही स्कूटर 15 ऑगस्टला लाँच करण्यात आली होती. तर त्या आधी महिनाभर या स्कूटरचे बुकिंग सुरु होते. ओलाने Ola S1 आणि Ola S1 Pro आजपासून विक्रीसाठी उपलब्ध केली आहे. पहिल्याच दिवशी बुकिंगचा 1 लाखांचा टप्पा पार करणाऱ्या ओला स्कूटरला आज किती प्रतिसाद मिळतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Ola Electric partners banks, financial institutes to offer loans to customers. )

जर तुम्ही ओला ईलेक्ट्रीक स्कूटर बुक केली असेल आणि खरेदी करण्यास इच्छुक असाल तर काही गोष्टींकडे तुम्हाल लक्ष द्यावे लागणार आहे. 

Ola Scooter च्या वाढीव किंमतीची पोलखोल?; जाणून घ्या बनवण्यासाठी किती येतो खर्च...

ओला स्कूटरची किंमत 99999 हजारांपासून सुरु होते. दुसऱ्या व्हेरिअंटची किंमत 1,29,999 रुपये आहे. महाराष्ट्रासह काही राज्यांनी सबसिडी जाहीर केली आहे. तर ज्या राज्यांमध्ये सबसिडी नाही त्यांना फक्त केंद्र सरकारचीच सबसिडी मिळणार आहे. 

कशी खरेदी करणार?
Ola Electric Scooters ची कोणतीही डिलरशीप नाहीय. ही स्कूटर तुम्ही ऑनलाईनच खरेदी करू शकता. आजपासून ओलाने विक्री सुरु केली आहे. कर्ज, अॅडव्हान्स आणि उरलेली रक्कम कधी भरायची, कशी भरायची याची माहिती खाली देत आहोत. जर तुम्हाला बुकिंग रद्द करायचे असेल तरी देखील ते कधीपर्यंत करता येईल ते देखील सांगणार आहोत. अनेक लोकांनी ओलाला टेस्ट ड्राईव्हशिवाय तुमच्यावर पैसे का उधळायचे असे प्रश्न उपस्थित केले आहेत. परंतू कंपनीने फक्त टेस्ट ड्राईव्ह करता येईल असेच सांगितले आहे. परंतू याची सोय कुठे, कधी केली जाईल याबाबत काहीही सांगितलेले नाही. 

गावातील लोकांना आजुबाजच्या पुणे, मुंबई, नागपूरसारख्या शहरात जाऊन टेस्ट ड्राईव्ह करावी लागण्याची शक्यता आहे. कारण सुरुवातीच्या काळात कंपनी छोट्या छोट्या शहरांमध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी ही स्कूटर उपलब्ध करण्याची शक्यता कमी आहे. 

महत्वाची लिंक... OLA Scooter बुक केलीय का? आज खरेदीची पहिली संधी; जाणून घ्या प्रोसेस..

टेस्ट राईड न घेताच कशी घ्यायची?
कोणतीही स्कूटर, बाईक किंवा कार ही टेस्ट राईड घेतल्याशिवाय आपण घेत नाही. मोठ्या मोठ्या कंपन्या देखील फसवितात. राईड हँडलिंग, तुम्हाला कम्फर्टेबल आहे का, फिचर्स काय आहेत हे पाहिल्याशिवाय घेऊ नका. ओला ऑक्टोबर पासून टेस्ट राईड आयोजित करणार आहे. टेस्ट राईड घेतल्यानंतरच निर्णय घ्या. तसेच टेस्ट राईड घेतली की त्यानंतर फॅक्टरीतून शिप होईस्तोवर तुमच्याकडे बुकिंग रद्द करण्याचा पर्याय आहे.
 

Web Title: Ola Electric scooter Sale Starts Today: Ola scooters can be purchased from today; Find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.