नवी दिल्ली : ओला इलेक्ट्रिक आपल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर S1 आणि S1 Pro वरून बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता कंपनी आपले नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. आगामी इलेक्ट्रिक कारचा फोटो ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या फोटोवरून चर्चेत असलेली ही कार कशी असेल, याबाबत अंदाज वर्तविला जात आहे.
छोट्या साइजमध्ये कारमिळालेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिक कार या डिझाइन प्रोटोटाइपमध्ये हॅचबॅकसारखी दिसते. ही कार पाहिल्यानंतर पहिल्यांदा निसान लीफ ईव्हीची आठवण होते, जी दिसायला अगदी सारखीच आहे. 5 दरवाजांमुळे या कारच्या केबिनमध्ये प्रवाशांना भरपूर जागा मिळणार आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहन निर्माता टेस्ला देखील एका छोट्या इलेक्ट्रिक हॅचबॅकवर काम करत आहे, जी सर्वात स्वस्त टेस्ला कार असेल आणि ती बाजारात मॉडेल 3 ची जागा घेईल. या इलेक्ट्रिक कारचे डिझाईन रेंडर इंटरनेटवर अनेक वेळा पाहिले गेले आहे आणि ओला इलेक्ट्रिक कार देखील त्यातून प्रेरित असल्याचे दिसून येते.
केबिनमध्ये मिळेल मोठी जागाओला इलेक्ट्रिक कारचा हा प्रोटोटाइप उत्पादनानंतर काही बदलांसह दिसेल. एलईडी लाईट्स व्यतिरिक्त, या कारच्या कॉम्पॅक्ट साइज केबिनमध्ये कार बाजारात आणली जाईल, अशी अपेक्षा आहे. कारमध्ये स्पोर्टी सीट आणि 360-डिग्री काचेच्या पॅनल्सशिवाय टॅब्लेटसारखी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, ज्यामुळे केबिन प्रशस्त दिसते. कंपनी कारला स्पोर्टी अलाव्ह व्हील्स देणार आहे. हे व्हील्स पिवळ्या ब्रेक कॅलिपर्ससह दिसतात.