ओलाने सुरु केले इलेक्ट्रीक स्कूटरचे सबस्क्रिप्शन प्लॅन; 1999 पासून सुरु, हवी तेवढी पळवू शकता...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 03:49 PM2023-01-29T15:49:16+5:302023-01-29T15:55:56+5:30
सबस्क्रिप्शनमध्ये दोन प्लॅन देण्यात आले आहेत. ओला सध्या सर्व्हिस व्हॅन आणि फिजिकल स्टोअर्सद्वारे 600 हून अधिक सेवा देत आहे.
देशातील हायफाय इलेक्ट्रीक स्कूटरची कंपनी ओलाने शुक्रवारी दोन नवे सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केले आहेत. याद्वारे ओला त्यांच्या ग्राहकांना टेन्शन फ्री राईड करण्याची सुविधा देणार आहे.
या प्लॅनचे नाव ओला केअर सबस्क्रिप्शन असे आहे. सबस्क्रिप्शनमध्ये दोन प्लॅन देण्यात आले आहेत. यामध्ये ओला केअर आणि ओला केअर प्लस अशी नावे ठेवण्यात आली आहेत. हे दोन्ही प्लॅन ओलाची स्कूटर घेणाऱ्यांना विक्रीपश्चात मोफत सेवा देण्यासाठी आणण्यात आले आहेत.
ओलाच्या पहिल्या प्लॅनची किंमत आहे, १९९९ रुपये आणि दुसऱ्या ओला केअर प्लसची किंमत आहे २९९९ रुपये वर्षाला.
ओला केअर योजनेत मोफत सेवा, चोरी झाल्यास तत्काळ मदत, स्कूटर कुठेही बिघडल्यास किंवा पंक्चर झाल्यास तत्काळ मदत दिली जाईल. ओला केअर+ व्यतिरिक्त, ओला केअरच्या फायद्यांमध्ये सर्वसमावेशक स्कूटर चेक-अप, मोफत होम सर्व्हिस आणि पिक-अप/ड्रॉप, मोफत डॉक्टर आणि रुग्णवाहिका सेवा वर्षभर केव्हाही समाविष्ट आहे.
ओला सध्या सर्व्हिस व्हॅन आणि फिजिकल स्टोअर्सद्वारे 600 हून अधिक सेवा देत आहे. यासह, कंपनी पूर्वीपेक्षा वेगवान सेवा प्रदान करते. कंपनीने एका दिवसात बहुतांश सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.