मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:52 AM2024-10-31T10:52:03+5:302024-10-31T10:52:45+5:30

दोन्ही उमेदवारांकडून हा मतदारसंघ आपापल्या पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघावरील हक्क कोणता पक्ष सोडणार आणि कोण उमेदवारी अर्ज माघारी घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 candidates from both sharad Pawars NCP and Congress in Pandharpur vidhan sabha seat Who will withdraw | मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार?

मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार?

Pandharpur Vidhan Sabha ( Marathi News ) :पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे या मतदारसंघावरचा हक्क कोण सोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

विठ्ठल साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार असे चित्र रंगले होते. परंतु भालके यांनी दिल्लीवारी करून काँग्रेसकडून एबी फार्म मिळविला आणि काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे व काँग्रेसचे भगीरथ भालके यांचे थेट लढत होईल, असे वाटत होते. दरम्यान, भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे सध्या वेगळीच चित्र निर्माण झाल्याचे दिसत आहे. या दोन्ही उमेदवारांकडून हा मतदारसंघ आपापल्या पक्षाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे या मतदारसंघावरील हक्क कोणता पक्ष सोडणार आणि कोण उमेदवारी अर्ज माघारी घेणार, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

उमेदवारांचं काय आहे म्हणणं?

"राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट व काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून अर्ज भरण्यात आले आहेत. अर्ज मागे घेण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. याबाबत वरूनच निर्णय होणार आहे," असं मत काँग्रेस उमेदवार आणि विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी मांडलं आहे.

दरम्यान, "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्गदर्शनाने पक्षाकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह उमेदवारी अर्ज भरला आहे. मला पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला आहे. यामुळे पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार आहे," अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अनिल सावंत यांनी मांडली आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 candidates from both sharad Pawars NCP and Congress in Pandharpur vidhan sabha seat Who will withdraw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.