Ajit pawar: निलेश लंकेंनी दिला अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शरद पवार गटात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 10:30 AM2024-10-31T10:30:46+5:302024-10-31T10:32:38+5:30
सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आहे.
सोलापूरमध्ये जवळपास सर्वच मतदारसंघांत बंड झालेले आहे. येत्या तीन-चार दिवसांत बंड थंड झाले तर ठीक नाहीतर निवडणूक मोठ्या चुरशीची होणार आहे. अशातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटातील निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा प्रवेश झाल्याने खळबळ उडाली आहे.
सोलापुरात ऐन निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे बार्शी तालुक्यातील नेते निरंजन भूमकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाला आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत गोविंद बाग येथे भूमकरांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. भूमकर हे वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत. तसेच या नगरपंचायतीवर भूमकर यांची एकहाती सत्ता आहे.