फुल चार्जवर २०० किमीची रेंज, भन्नाट फीचर्स; १,९९९ रुपयांत बुक करता येणार 'ही' स्वदेशी Electric Scooter
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 15:24 IST2021-12-30T15:23:37+5:302021-12-30T15:24:53+5:30
Electric Vehicles : सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेकजण पर्यायी वाहनांकडे, तसंच प्राधान्यानं इलेक्ट्रीक वाहनांकडे वळताना दिसत आहेत.

फुल चार्जवर २०० किमीची रेंज, भन्नाट फीचर्स; १,९९९ रुपयांत बुक करता येणार 'ही' स्वदेशी Electric Scooter
Electric Vehicle In India : स्वदेशी कंपनी ओकायानं (Okaya) एक शक्तिशाली इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooter) लाँच केली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर, ओकायाची ही इलेक्ट्रीक स्कूटर 200 किमीची रेंज देते. ओकायाच्या या इलेक्ट्रीक स्कूटरचे नाव फास्ट (Faast) आहे. ओकाया फास्टचे बुकिंगही सुरू झालं असून ग्राहक ही इलेक्ट्रीक स्कूटर ओकाया येथून फक्त 1,999 रुपये भरून बुक करू शकतात. भारतीय बाजारपेठेत ओकायाची ही इलेक्ट्रिक स्कूटर ओलाच्या S1, TVS च्या iQube, Bounce Infinity E1 आणि बजाज चेतक इलेक्ट्रीकशी स्पर्धा करेल.
Okaya Faast इलेक्ट्रीक स्कूटर उत्कृष्ट लूकसह आली आहे. स्कूटरमध्ये ऑल-एलईडी लाइटिंग सेटअप आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये 4.4kW बॅटरी पॅक देण्यात आले असून यामुळे ही स्कूटरला जास्तीत जास्त 200 किमीची रेंज देते. ओकाया फास्टमध्ये मॅक्सी स्कूटरसारखं डिझाईन आहे आणि ती ड्युअल-टोन पेंट स्कीमसह येते. इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा डीलरशिपवर करता येऊ शकते. पुढील वर्षी जानेवारीच्या अखेरीस या इलेक्ट्रीक स्कूटरची डिलिव्हरी सुरू होईल.
70 किमी प्रति तास कमाल वेग
ओकायाची ही इलेक्ट्रीक स्कूटर रेड, ग्रे, ग्रीन आणि व्हाईट कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या इलेक्ट्रीक स्कूटरचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. ओकाया फास्ट इलेक्ट्रीक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 89,999 रुपये आहे. स्कूटरमध्ये लिथियम फॉस्फेट बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ओकाया फास्ट इलेक्ट्रीक स्कूटरच्या चाकांना डिस्क/ड्रम ब्रेक किंवा दोन्हीचे कॉम्बिनेशन दिले जाऊ शकते. स्कूटरच्या पुढील बाजूस स्टँडर्ड टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनो शॉक अथवा ड्युअल शॉक युनिट दिले जाऊ शकतात.