बापरे...! या राज्यात आजपर्यंत एकही ईव्ही विकली गेली नाही; पाच वर्षांची आकडेवारी आली, पहा कोण पुढे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 08:13 IST2024-12-17T08:12:59+5:302024-12-17T08:13:39+5:30
EV Sale in India: सबसिडीकाळात किती ईव्ही विकल्या गेल्या याची आकडेवारी आली आहे. केंद्राने एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या काळातील ईव्हींच्या विक्रीची माहिती संसदेत दिली आहे.

बापरे...! या राज्यात आजपर्यंत एकही ईव्ही विकली गेली नाही; पाच वर्षांची आकडेवारी आली, पहा कोण पुढे
भारतीयांनी आजही इलेक्ट्रीक वाहनांना स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. इलेक्ट्रीक वाहनांमधील समस्या, चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आदी गोष्टी यातून हे क्षेत्र मार्ग काढत आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारांनी सबसिडी देत आहेत, या सबसिडीकाळात किती ईव्ही विकल्या गेल्या याची आकडेवारी आली आहे. केंद्राने एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या काळातील ईव्हींच्या विक्रीची माहिती संसदेत दिली आहे.
एप्रिल २०१९ ते मार्च २०२४ या पाच वर्षांच्या काळात केवळ 36,39,617 एवढी ईव्ही वाहने विकली गेली आहेत. खरेतरी दिल्लीतील प्रदुषणावरून सबसिडी सुरु झाली. आजही तिथे सबसिडी दिली जात आहे. परंतू, सर्वाधिक ईव्ही खपामध्ये उत्तर प्रदेशने बाजी मारली आहे. महाराष्ट्रातही लोक ईव्हीकडे वळलेले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये या पाच वर्षांत 665247 ईव्ही विकल्या गेल्या आहेत. यानंतर महाराष्ट्रात 439358 ईव्ही विकल्या गेल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक असून तिथे 350810 ईव्ही विकल्या गेल्या आहेत. चौथा तामिळनाडू - 228850, पाचवे राज्य राजस्थान - 233503 असून दिल्ली सातव्या क्रमांकावर आहे. दिल्लीत 216084 एवढ्याच ईव्ही विकल्या गेल्या आहेत.
ही आकडेवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मंत्रालयाने संसदेत दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सिक्कीममध्ये या काळात एकही ईव्ही विकली गेलेली नाहीय. तर लक्षद्वीप, नागालँड, अरुणाचल प्रदेशमध्ये अनुक्रमे १९, २७, ४२ अशा आकड्यांमध्ये ईव्ही विकल्या गेल्या आहेत.