केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज देशातील इंधनाच्या भविष्याची झलक दाखवली. ते दिल्लीमध्ये १०० टक्के बायो-इथेनॉलवर चालणाऱ्या 'फ्लेक्स-फ्युएल' टोयोटा इनोव्हा कारमधून प्रवास करताना दिसले. प्रदूषण कमी करणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व संपवणे, हेच भारताचे भविष्य आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
इथेनॉलच्या वापराने किती मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो, हे देखील गडकरी यांनी यावेळी हिशेब मांडत सांगितले. सध्या बाजारात इथेनॉलची किंमत अंदाजे ₹६५ प्रति लीटर आहे, तर पेट्रोलची किंमत सुमारे ₹१२० प्रति लीटर आहे. प्रवास करताना ही कार ६० टक्क्यांपर्यंत वीजही निर्माण करते. त्यामुळे या वाहनाने प्रवास करण्याचा प्रभावी खर्च सुमारे ₹२५ प्रति लीटर इतका कमी होतो, असा दावा गडकरी यांनी केला आहे.
जेव्हा इंधन इतके स्वस्त होईल, तेव्हाच लोक मोठ्या संख्येने इथेनॉलचा स्वीकार करतील. इथेनॉल थेट शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, कारण ते कृषी उत्पादने आणि त्यांच्या उप-उत्पादनांमधून (उदा. तांदूळ, मका, उसाचा रस, शेतीतला कचरा) तयार केले जाते. यामुळे प्रदूषण होत नाही आणि हे 'ग्रीन फ्युएल' असल्याने शेतकऱ्यांचा मोठा फायदा होईल, असेही गडकरी म्हणाले.
सध्याची स्थितीसध्या देशात सुमारे ५५० इथेनॉल प्लांट कार्यरत आहेत आणि पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण करण्याची योजना आधीच लागू झाली आहे. या ई २० वरून आधीच वाहन मालक त्रस्त झालेले आहेत. परंतू, त्यांचा आवाज ऐकला जात नाहीय. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार आणि गडकरींवर टीका झाली होती. वाहनाचा मेन्टेनन्स वाढला आहे, इंधनाच्या टाकीत इथेनॉलमुळे पाणी तयार होण्याचा धोका वाढलेला आहे. तसेच वाहन मायलेजही कमी देत आहे. अशाप्रकारे तिहेरी हल्ला वाहन मालकांवर झालेला आहे.
Web Summary : Nitin Gadkari showcased a bio-ethanol car, emphasizing its benefits: reduced pollution, increased farmer income, and decreased fossil fuel dependence. He highlighted ethanol's cost-effectiveness, estimating an effective price of ₹25 per liter due to electricity generation. Current ethanol blended fuel users are reportedly facing maintenance and mileage issues.
Web Summary : नितिन गडकरी ने बायो-इथेनॉल कार का प्रदर्शन किया, इसके लाभों पर जोर दिया: कम प्रदूषण, किसानों की आय में वृद्धि और जीवाश्म ईंधन पर निर्भरता में कमी। उन्होंने इथेनॉल की लागत-प्रभावशीलता पर प्रकाश डाला, बिजली उत्पादन के कारण ₹25 प्रति लीटर की प्रभावी कीमत का अनुमान लगाया। वर्तमान इथेनॉल मिश्रित ईंधन उपयोगकर्ताओं को रखरखाव और माइलेज की समस्याओं का सामना करना पड़ रहा है।