थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:46 IST2025-08-07T09:46:39+5:302025-08-07T09:46:56+5:30
E20 petrol Mileage Problem: देशभरातील पेट्रोल पंपांवर आता E20 इंधन विकले जात आहे. वाहन कंपन्या देखील ई २० वर चालणारी वाहने बनवत आहेत. परंतू, खरी कोंडी झाली आहे ती जुन्या वाहन मालकांची.

थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे जुन्या वाहनांचे मायलेज सहा टक्क्यांनी कमी होते, हे केंद्र सरकारनेच मान्य केले आहे. एवढेच नाही तर वाहनाचा मेंटेनन्सही यामुळे वाढत आहे. यामुळे वाहन चालकांच्या या दाव्याला पुष्टी मिळत आहे. असे असले तरी फायदे पाहता मायलेजमधील खूप कमी असल्याची सारवासारव मंत्रालयाने केली आहे. हे E20 इंधन वाहनचालकांना हवे आहे का? याबाबत काही सर्व्हे आले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा खूप जास्त असल्याचे हा सर्व्हे सांगत आहे.
देशभरातील पेट्रोल पंपांवर आता E20 इंधन विकले जात आहे. वाहन कंपन्या देखील ई २० वर चालणारी वाहने बनवत आहेत. परंतू, खरी कोंडी झाली आहे ती जुन्या वाहन मालकांची. देशात अद्याप करोडो वाहने ही जुन्या इंधनावरच चालणारी आहेत. यामुळे या वाहनचालकांना आता खिशाला भार आणि जिवाला घोर पडू लागला आहे.
प्रत्येकी ३ पैकी २ कार मालकांनी त्यांच्या वाहनाच्या मायलेजमध्ये घट झाल्याचे म्हटले आहे. ज्यांची वाहने एप्रिल २०२३ पूर्वीची आहे त्यांना ही समस्या भेडसावू लागली आहे. सरकारने असेही मान्य केले आहे की काही जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये थोडीशी घट होऊ शकते आणि सदोष भागांवर थोडासा खर्च होऊ शकतो.
लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात पूर्वीच्या तुलनेत २०२२ किंवा त्यापूर्वीच्या वाहनांना आता कमी मायलेज मिळत आहे. या वाहन मालकांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोधा केला आहे. या प्रश्नावर १४,१२७ वाहन मालकांशी चर्चा करण्यात आली. यापैकी १२% लोकांनी E20 इंधनाचे समर्थन केले आहे. तर ४४% लोकांनी हे इंधन नको असे सांगितले आहे. २२% लोकांनी नकार देताना जर सरकारने E5, E10 किंवा E20 यापैकी इंधन निवडण्याचे पर्याय दिले तर त्यास तयार असल्याचे म्हटले आहे. परंतू हे पूर्णपणे अशक्य आहे. २२% लोकांना याबाबत काहीच कल्पना नाहीय.
मायलेज किती घटले...
आणखी एका सर्व्हेमध्ये २२,२८२ लोकांचे मत घेण्यात आले. या सर्वेक्षणात २०२२ किंवा त्याहून अधिक जुन्या वाहन मालकांचा समावेश होता. यापैकी ११ टक्के लोकांनुसार वाहनाच्या मायलेजमध्ये सुमारे २०% घट झाली आहे. तर २२ टक्के लोकांनुसार ही घट सुमारे १५-२०% च्या दरम्यान आहे. ११ टक्के लोकांनुसार मायलेज १०-१५% ने कमी झाले आहे, तर १४ टक्के लोकांनुसार मायलेज ५-१०% ने कमी झाले आहे. ११ टक्के लोकांनी सांगितले की E20 इंधनामुळे कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे.