शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

Nitin Gadkari : गडकरींची संसदेत मोठी घोषणा; वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार, महामार्गावर GPS ट्रॅकर लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 12:31 PM

Remove all toll plaza in one year Modi Government road national highway GPS tracking :Nitin Gadkari in Lok Sabha : वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यावर काम सुरू असल्याची गडकरींची संसदेत घोषणा

ठळक मुद्देवर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यावर काम सुरू असल्याची गडकरींची संसदेत घोषणाकेंद्र सरकारनं सर्व वाहनांसाठी FASTag केलंय अनिवार्य

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीNitin Gadkari  यांनी गुरूवारी संसदेत मोठी घोषणा केली. सरकार पुढील वर्षभरात टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं त्यांनी संसदेत सांगितलं. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीनं टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढं त्यांचं वाहन रस्त्यांवर चालेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. Remove all toll plaza in one year Modi Government road National Highway GPS tracking : Nitin Gadkari in Lok Sabha :  वर्षभरात सर्व टोलनाके हटवण्यावर काम सुरू असल्याची गडकरींची संसदेत घोषणाअमरोहा येथील बसपचे खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वर नजीक रस्त्यावर नगरपालिकेच्या सीमेत टोलनाके असल्याचा मुद्दा संसदेत उचलला होता. यावर उत्तर देताना गडकरी यांनी FASTag लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. "यापूर्वीच्या सरकारमध्ये रस्ते योजनांच्या कंत्राटात थोडी आणखी मलाई घालण्यासाठी असे काही टोलनाके उभारण्यात आले जे नगरपालिकांच्या सीमेत आहेत. परंतु हे नक्कीच चुकीचं आणि अन्यायकारक आहे," असं गडकरी म्हणाले. "आता हे सर्व टोलनाके काढले गेले तर नक्कीच रस्ता तयार करणारी कंपनी याची भरपाई मागेल, परंतु सरकारनं येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे," असंही त्यांनी सांगितलं. टोलनाके हटवण्याचा अर्थ हा टोल वसूली बंद करण्यावर नाही तर केवळ टोलनाके हटवणं असा आहे. सरकार सध्या अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्याच्या माध्यमातून वाहन जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर येईल तेव्हा जीपीएसच्या मदतीनं कॅमेरा तुमच्या वाहनाचा फोटो घेईल. तसंच जेव्हा तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून बाहेर पडाल तेव्हा तुमच्या वाहनाचा फोटो घेतला जाईल. यानुसार वाहन चालकांना तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार असल्याचं गडकरींनी सांगितलं.  टोल नाक्यांवर टोल वसूलीदरम्यान वाहनांच्या लागत असलेल्या रांगांमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारनं सर्व राष्ट्रीय महामार्गांवर FASTag ची सुविधा सुरू केली आहे. यामुळे लाईनमध्ये न लागताच ऑटोमॅटिक पद्धतीनं टोलनाक्यांवर टोल भरता येऊ शकतो. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtollplazaटोलनाकाFastagफास्टॅगhighwayमहामार्गParliamentसंसद