4 Star Safety Features Rating Car : काना मागून आली! निस्सान मॅग्नाईटसह या चार कार्सना फोर स्टार सेफ्टी रेटिंग; मारुतीवर कडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 18:25 IST2022-02-15T18:24:57+5:302022-02-15T18:25:20+5:30
Nissan Magnite And Renault Kiger Safety Features: चार मेड इन इंडिया कार्सना मिळालं ४ स्टार सेफ्टी रेटिंग.

4 Star Safety Features Rating Car : काना मागून आली! निस्सान मॅग्नाईटसह या चार कार्सना फोर स्टार सेफ्टी रेटिंग; मारुतीवर कडी
Nissan Magnite And Renault Kiger Safety Features: टाटा मोटर्स (TATA Motors) आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) सारख्या कंपन्यांच्या कार भारतात सर्वात सुरक्षित मानल्या जातात. यामुळेच विशेषतः टाटा एसयूव्हीला ग्राहकांची भरपूर पसंती मिळते. आता आणखी एक चांगली बातमी समोर येत असून Global NCAP ने मेड इन इंडिया Nissan Magnite, Renault Kiger सारख्या दोन स्वस्त एसयुव्हीसोंबत Honda City Sedan आणि Honda Jazz प्रीमियम हॅचबॅकला कार क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग दिलं आहे. दरम्यान, या कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
भारतातील सर्वात परवडणारी सब-4 मीटर SUV निसान मॅग्नाइटला ग्लोबल NCAP सुरक्षा रेटिंगमध्ये 4 स्टार मिळाले आहेत. SUV नं एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 4 स्टार आणि चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 2 स्टार देण्यात आलेत. या SUV मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS सारखे फीचर्स आहेत. त्याच वेळी, कार क्रॅश टेस्टमध्ये Kiger ला ग्लोबल NCAP द्वारे 4- स्टार सेफ्टी रेटिंग दिले गेले आहे. SUV ला अॅडल्ट प्रोटेक्शनमध्ये 4 स्टार आणि चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन कॅटेगरीत 2 स्टार मिळाले आहेत. अशा प्रकारे, लोकांना आता कमी किमतीत चांगली सेफ्टी फीचर्स असलेली SUV मिळू शकते आणि त्यांच्यासोबत Nissan Magnite आणि Renault Kiger हेदेखील चांगले ऑप्शन्स आहेत.
होंडा सिटी आणि जॅझही सुरक्षित कार्स
या दोन SUV सोबत, ग्लोबल एनकॅपने क्रॅश टेस्टमध्ये 2 आणखी मेड इन इंडिया कारला 4 स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. Honda City ही प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये तसेच प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहेय Honda Jazz ने अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन कॅटेगरीमध्ये 4 स्टार मिळवले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.