या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 15:52 IST2025-08-12T15:03:59+5:302025-08-12T15:52:08+5:30
Nissan Magnite Extended Warranty: ऑटोमोबाईल बाजारात आता वॉरंटी देण्याची स्पर्धा लागली आहे. टाटाने आपल्या ईलेक्ट्रीक कारवर १५ वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे.

या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
ऑटोमोबाईल बाजारात आता वॉरंटी देण्याची स्पर्धा लागली आहे. टाटाने आपल्या ईलेक्ट्रीक कारवर १५ वर्षांची वॉरंटी जाहीर केली आहे. आधीच कंपन्या दोन-तीन वर्षे वॉरंटी देत आहेत, पुन्हा ग्राहकाला हवी असेल तर एक्स्टेंडेड वॉरंटी पैसे घेऊन उपलब्ध केली जात आहे. ही वॉरंटी पुढे ५ वर्षे घेते येत होती. परंतू, निस्सान या जपानी ऑटो कंपनीने या सर्वांवर कडी केली आहे.
निस्सानने मॅग्नाईट या भारतीय बाजारात सध्या एकमेव असलेल्या कारवर १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी योजना जाहीर केली आहे. आधीच या कारवर कंपनी तीन वर्षांची वॉरंटी देत आहे. यावर आणखी ७ वर्षांची वॉरंटी पैसे घेऊन दिली जाणार आहे. निस्सानच्या या कारला नुकतीच फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
निस्सानच्या या एक्स्टेंडेट वॉरंटीसाठी प्रति किमी २२ पैसे किंवा प्रति दिन १२ रुपये याप्रमाणे पैसे मोजावे लागणार आहेत. शिवाय ही वॉरंटी १० वर्षे किंवा २ लाख किमी रनिंग यापैकी जे आधी होईल त्यावर लागू असणार आहे. काही ठिकाणी डीलर कंपनीची वॉरंटी संपली की आपल्या स्तरावर अशी वॉरंटी देत असतात. परंतू निस्सानची ही वॉरंटी देशभरातील सर्व अधिकृत सर्व्हिस सेंटरवर मिळणार आहे. यातून कार दुरुस्तीचा सर्व खर्च उचलला जाणार आहे.
३+४, ३+३, ३+२ आणि ३+१ वर्षांचा पर्याय यात असणार आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये आलेल्या न्यू निस्सान मॅग्नाइटला ही वॉरंटी मिळणार आहे. ही वॉरंटी कार खरेदी करताना कर्जावर देखील घेता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. निस्सान भारत सोडून जाण्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरु होती, रेनॉल्टला आपला प्रकल्प विकला होता. यावर कंपनीने खुलासा केला होता. यातच आता १० वर्षांची वॉरंटी जाहीर करून कंपनीने भारत सोडून जात नसल्याची बाब पेरण्यास सुरुवात केली आहे.