शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

सिंगल चार्जमध्ये 190 किमी रेंज; किंमत पाहून खरेदी करण्याची इच्छा होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 14:52 IST

nij automotive launched accelero electric scooter in india : कंपनीने एक्‍सेलेरो प्लस (Asselero Plus) इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरॅंग स्टाइल एलईडी इंडिकेटरसह खूपच आकर्षक दिसते.

नवी दिल्ली : गेल्या दोन वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांबद्दलची क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. विशेषत: दुचाकी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे कल दिसत आहे. अशा परिस्थितीत, कंपन्यांनाही या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे आणि मोठ्या वाहन निर्मात्यांसोबत जवळजवळ प्रत्येक महिन्याला अनेक स्टार्टअप्स आपल्या नवीन इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करत आहेत. यापैकी एक NIJ ऑटोमोटिव्ह कंपनी आहे. कंपनीने एक्‍सेलेरो प्लस (Asselero Plus) इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. ही ड्युअल एलईडी हेडलॅम्प, एलईडी डीआरएल आणि बूमरॅंग स्टाइल एलईडी इंडिकेटरसह खूपच आकर्षक दिसते.

3 एलएफपी बॅटरी पॅक कंपनीने ही स्कूटर इंपीरियल रेड, ब्लॅक ब्युटी, पर्ल व्हाइट आणि ग्रे टचमध्ये लॉन्च केली आहे. एक्‍सेलेरो प्लससोबत क्रूझ कंट्रोल सारखे फिचर देण्यात आले आहे, जे लांब पल्ल्याचा प्रवास करताना खूप उपयुक्त आहे. स्कूटर चार बॅटरी कॉन्फिगरेशनमध्ये येते, ज्यामध्ये लीड-ऍसिड बॅटरी आणि 3 एलएफपी बॅटरी पॅक समाविष्ट आहेत. एलएफपी बॅटरी ऑप्शनमध्ये 1.5 kW (48 V), 1.5 kW (60 V) आणि 3 kW सह 48 V ड्युअल बॅटरी सेटअपसह येतात.

इको मोडवर सर्वाधिक 190 किमीची रेंजएक्‍सेलेरो प्लसला तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत, ज्यामध्ये स्कूटरला इको मोडवर सर्वाधिक 190 किमीची रेंज मिळते. सिटी मोडमध्ये, ती एका चार्जवर 140 किमी पर्यंत चालते. निवडलेल्या लीड-अ‍ॅसिड बॅटरी पॅकवर अवलंबून एक्‍सेलेरो आणि एक्‍सेलेरो प्लसची एक्स-शोरूम किंमत 53,000 रुपयांपासून ते 98,000 रुपयांपर्यंत आहे. कंपनी या वर्षाच्या अखेरीस आपली पाचवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे, ज्याचे नाव R14 असेल. ही स्कूटर तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत असेल आणि तिची रेंजही सर्वाधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनbusinessव्यवसाय