Renault Kiger चे नवीन व्हेरिएंट लॉन्च, कमी किमतीत मिळतील जास्त फीचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 15:04 IST2023-05-02T14:58:17+5:302023-05-02T15:04:51+5:30
ग्राहकांसाठी Renault Kiger चे नवीन व्हेरिएंट लॉन्च झाले आहे. जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...

Renault Kiger चे नवीन व्हेरिएंट लॉन्च, कमी किमतीत मिळतील जास्त फीचर्स...
Renault ने आपल्या Kiger लाइनअपमध्ये ग्राहकांसाठी नवीन Kiger RXT (O) MT व्हेरिएंट लॉन्च केले आहे. कंपनीने फक्त या कारचे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले नाही, तर पूर्वीच्या RXZ व्हेरिएंटवर हजारो रुपयांचा डिस्काउंट जाहीर केला आहे. जाणून घेऊ या नवीन व्हेरिएंटची किंमत आणि यात मिळणाऱ्या फीचर्सबद्दल.
Renault Kiger RXT (O) MT
रेनोच्या या कारमध्ये तुम्हाला 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेमेंट सिस्टीम मिळेल. यासोबतच वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, अलॉय व्हील्स, एलईडी हेडलँप्स असतील. सेफ्टीसाठी कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम दिले जाईल. या व्हेरिएंटची किंमत 7 लाख 99 हजार (एक्स-शोरूम) असेल.
इंजिन डिटेल्स
Renault Kiger मध्ये 1 लीटरचे पेट्रोल इंजिन मिळेल. हे नॅच्युरली एस्पिरेटेड आणि टर्बोचार्जर ऑप्शनसह मिळेल. टर्बोचार्ज्ड इंजिन 99bhp पॉवर आणि 152Nm टॉर्क जरनेट करेल. या कारमध्ये तुम्हाला मॅनुअल, AMT आणि CVT इंजिन मिळेल.
कारची सेफ्टी रेटिंग किती?
विशेष म्हणजे, रेनोच्या या कारला Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहेत. या कारमध्ये चार एअरबॅग्स, स्पीड अँड क्रॅश सेंसिंग डोर लॉक आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर्स मिळतात.
Renault Kiger RXZ व्हेरिएंटवर किती डिस्काउंट
नवीन व्हेरिएंटची किंमत आणि फीचर्सबद्दल आपण ऐकलं, आता RXZ व्हेरिएंटवर मिळणाऱ्या डिस्काउंटविषयी माहिती घेऊ. रेनोच्या या कारच्या व्हेरिएंटवर 10 हजारांचा डिस्काउंट, 20 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 49 हजार रुपयांचे लॉयलटी बेनिफिट्स मिळतील.