Volkswagen Taigun अन् Virtus ला देण्यात आले हे नवे खास फीचर्स, नवी एडिशनही लॉन्च!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 21:49 IST2023-10-03T21:48:26+5:302023-10-03T21:49:23+5:30
कंपनीने व्हर्टस मॅट एडिशनच्या लॉन्च बरोबरच आपल्या जीटी एज कलेक्शनचाही विस्तार केला आहे.

Volkswagen Taigun अन् Virtus ला देण्यात आले हे नवे खास फीचर्स, नवी एडिशनही लॉन्च!
फॉक्सवॅगनने सनासुदीच्या दिवसांपूर्वीच Taigun आणि Virtus ला काही नव्या फीचर्ससह अपडेट केले आहे. एवढेच नाही, तर कंपनीने व्हर्टस मॅट एडिशनही सादर केली आहे. फॉक्सवॅगन इंडियाने फॉक्सफेस्ट 2023 ची घोषणाही केली आहे. यात ग्राहकांना 3 ऑक्टोबरपासून विशेष ऑफर आणि लाभ मिळेल. कंपनीने व्हर्टस मॅट एडिशनच्या लॉन्च बरोबरच आपल्या जीटी एज कलेक्शनचाही विस्तार केला आहे.
फॉक्सवॅगन Taigun आणि Virtus ला डायनॅमिक आणि परफॉर्मन्स लाइनचे टॉपलाइन आणि जीटी प्लस व्हेरिअँटमध्ये इलेक्ट्रिक फ्रंट सीट आणि फुटवेल लायटिंग देण्यात आली आहे. याशिवाय फॉक्सवॅगनने Taigun आणि Virtus च्या जीटी प्लस व्हेरिअंटमध्ये एक सब-वूफर आणि अॅम्पलीफायरही देण्यात आले आहे.
या शिवाय, Taigun मॅट एडिशनच्या यशानंतर कंपनीने Virtus मॅट एडिशन (कार्बन स्टील ग्रे मॅट) सादर केली आहे. यामुळे ही कार आणखीनच आकर्शक दिसते. फॉक्सवॅगन Virtus चे मॅट एडिशन प्रामुख्याने ऑनलाइन बुकिंगच्या माध्यमाने उपलब्ध आहे.