New Hyundai i20 launch in India; Know the price and features | भारतात नवी Hyundai i20 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

भारतात नवी Hyundai i20 लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

नवी दिल्ली : ह्युंदाई मोटर्सने (Hyundai Motors) आज हॅचबॅक ह्युंदाई आय 20 चे तिसरे जनरेशन लाँच केले आहे. ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही इंधन प्रकारात उपलब्ध आहे. दोन्ही प्रकारातील 24 व्हेरिअंट कंपनीने बाजारात आणले आहेत. 


नव्या ह्युंदाई आय 20 (Hyundai i20) पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरु होते. तर टॉप मॉडेलची किंमत 11.18 लाख रुपये (एक्स शो रूम, दिल्ली) आहे. तर डिझेल व्हेरिअंटची किंमत 8.20 लाख रुपयांपासून सुरु होते. टॉप मॉडेलची किंमत  10.60 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. All New Hyundai i20 ही Magna, Sportz, Asta आणि Asta (O) सारख्या ट्रीममध्ये उपलब्ध आहे. या ट्रीममध्ये वेगवेगळ्या फिचरचे 24 व्हेरिअंट आहेत. 


All New Hyundai i20 च्या टक्करमध्ये Tata Altroz आणि Maruti Suzuki Baleno सारख्या कार आहेत. ह्युदाई आय 20 ला तीन इंजिन प्रकारात लाँच करण्यात आले आहे. 1.2 लीटर 4 सिलिंडर naturally aspirated पेट्रोल इंजिन, 1.0 लीटर 3 सिलिंडर turbocharged पेट्रोल इंजिन, 1.5 लीटर 4 सिलिंडर टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. 


All New Hyundai i20 च्या Sportz trim मध्ये तिन्ही इंजिनांचे पर्याय उपलब्ध आहेत. 1.2 लीटर पेट्रोल MT आणि सीव्हीटी, 1.0 लीटर पेट्रोल iMT आणि 1.5L डीजल MT या ट्रीममध्ये देण्यात आले आहे. तर टॉप सेगमेंटमध्ये Asta (O) ट्रिम 1.2 लीटर MT, 1.0 लीटर DCT आणि 1.5 लीटर MT इंजिन व गिअरबॉक्स ऑप्शन देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे ही कार 5 स्पीड, 6 स्पीड आणि 7 स्पीड ट्रांसमिशनसोबत येते. 

Magna 1.2 लीटर MT ची किंमत 6.79 लाख रुपये, Sportz 1.2 लीटर MT ची किंमत 7.59 लाख रुपये, Asta 1.2 लीटर MT ची किंमत 8.7 लाख रुपये, Asta (O) 1.2 लीटर MT ची किंमत 9.2 लाख रुपये, Sportz 1.2 लीटर CVT ची किंमत 8.6 लाख रुपये, Asta 1.2 लीटर CVT ची किंमत 9.7 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: New Hyundai i20 launch in India; Know the price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.